पवित्र पोर्टल शिक्षक भरती नियमात मोठे बदल
पवित्र पोर्टल शिक्षक भरती नियमात मोठे बदल
नुकत्याच शासनाने राज्यातील शिक्षक भारती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पवित्र पोर्टल च्या कार्यपद्धतीत काही महत्वाचे बदल, सुधारणा केल्या आहेत. या संदर्भात 20 जानेवारी 2026 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शिक्षक भारती प्रक्रियेचे जुने नियम पूर्णपणे रद्द होऊन नाविन सुधारित नियम आणि तरतुदी लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सेमी-इंग्रजी शाळांतील शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि टीईटी परीक्षा अनिवार्य राहील. पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी या शैक्षणिक गटांसाठी शाळेचे माध्यम व त्यानुसार पात्रता विचारात घेतली जाईल
या बदलानुसार शाळेच्या माध्यमानुसार आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याने ज्या माध्यमातून त्याने शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठीच त्याची निवड करण्यात येईल.

इयत्ता १ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरीता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र १२ वी विज्ञान किंवा बी.ए./एम.ए. इंग्रजी किंवा बी.एस्सी/एम.एस्सी अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे.
महत्वाचे बदल
1. शाळांचे माध्यम नुसार शैक्षणिक अर्हता असावी.
2. 1 ते 5 गटासाठी सेमी इंग्रजी माध्यमासाठी व्यावसाईक अर्हता इंग्रजी माध्यमाची असेल. जर उमेदवार उपलब्ध नाही झाला तर शैक्षणिक अर्हता इंग्रजी असावी.
