दहावी गणित | Board Exam 2023 IMP | बोर्डाला आलेले प्रश्न | महत्वाचे प्रश्न

दहावी गणित | Board Exam 2023 IMP | बोर्डाला आलेले प्रश्न | महत्वाचे प्रश्न

नमस्कार मित्रानो या पानावर इयत्ता दहावी गणित भाग एक आणि भाग दोन या विषयांच्या महत्वाच्या गणिताच्या व्हिडियो तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. खालील बटानांवर क्लिक क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडियो बघू शकता.

लवकरच पुढील व्हिडियो येथे अपडेट केल्या जातील.

यावर्षी मार्च २०२३ ची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून २५ मार्च २०२३ रोजी संपणार आहे. गणित भाग १ विषयाचा पेपर ४० गुणांचा तर गणित भाग २ या विषयाचा पेपर ४० गुणांसाठी असणार आहे. अशाप्रकारे लेखी परीक्षा ८० गुणांची असणार असून २० गुण हे अंतर्गत मूल्यमापनाचे असणार आहे. गणित भाग १ या विषयावर १० गुण तर गणित भाग २ साठी १० गुण असतील. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न आणि गृहपाठ मिळून २० गुण असतील. बहुपर्यायी प्रश्नांसाठी १० गुण तर गृहपाठासाठी १० गुण असतील. यामुळे आपले गृहपाठ आणि गृहपाठाच्या वह्या पूर्ण करून ठेवा जेणेकरून गृहपाठात आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. तसेच लेखी परीक्षेसाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करा.

दहावी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका | SSC Board Exam Question Paper | Maharashtra Board

दहावी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका | SSC Board Exam Question Paper | Maharashtra Board

नमस्कार मित्रांनो,

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांची तयारी खूप चांगल्या प्रकारे सुरु असेल. परंतु परीक्षेत नेमके कशाप्रकाराचे प्रश्न विचारले जाणार? पेपर कसा असेल? असे प्रश्न नक्कीच तुम्हा सर्वाना पडत असतील. तर काळजी करू नका. आज आपण तुम्हाला मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका शेअर करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका स्वरूप लक्षात येईल आणि पेपर मध्ये नेमके कशाप्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. जास्तीत जास्त विषयांच्या PDF FILE आपण खालील लिंक वर क्लिक करून बघू शकता. या प्रश्नपत्रिका बोर्ड परीक्षेच्या सरावाच्या अनुषंगाने खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. या प्रश्न पत्रिकांचा चांगल्या प्रकारे सराव करा.

Maharashtra Board Exam 2023 | Practice Question Paper | Math | गणित सराव प्रश्नपत्रिका

Maharashtra Board Exam 2023 | Practice Question Paper | Math | गणित सराव प्रश्नपत्रिका

यावर्षी २०२३ मध्ये इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च पासून सुरु होणार आहे. पहिला पेपर मराठी विषयाचा असून शेवट भूगोल या पेपरने होणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला १०० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. तसेच मागील वर्षी आपण आपापल्या शाळेत परीक्षा दिल्या तसे यावर्षी नसेल. यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा बोर्डाने नमूद केलेल्या केंद्रावर होईल. तसेच मागील वर्षी काही अतिरिक्त वेळ पेपर लिहिण्यास देण्यात आला होता. असा वेळ यावर्षी नसेल. त्यामुळे सर्व विषयांचा सराव करणे खूप गरजेची आहे. आज मी तुम्हाला गणित गणित विषयाच्या सरावाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या प्रश्नपत्रिका देणार आहे. प्रत्येक प्रकरणावर आधारित या प्रश्नपत्रिका आहेत. प्रत्येक प्रकरणावर २० गुणांची परीक्षा असणार आहे. या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षा २०२३ मध्ये उत्तम यश मिळेल.

खलील लिंक वर क्लिक करून प्रश्नपत्रिका मिळावा

दहावी – बारावी बोर्ड परीक्षा २०२३  वेळापत्रक | SSC / HSC Maharashtra Board 10th Exam 2023 Timetable

दहावी बारावी बोर्ड परीक्षा २०२३  वेळापत्रक | SSC Maharashtra Board 10th Exam 2023 Timetable

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून २५ मार्च ला संपणार आहे. पहिला पेपर मराठी या विषयाचा असून शेवटचा पेपर भूगोल विषयाचा असणार आहे. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

दहावी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक

बारावी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक

यावर्षी च्या परीक्षेसंबंधी काही महत्वाच्या अपडेट खालीलप्रमाणे आहेत.

  • यावर्षी ८० गुणांच्या पेपरसाठी ३ तास तर ४० गुणांच्या पेपर साठी २ तासांचा कालावधी असणार आहे. मागील वर्षी ८० गुणांच्या पेपर साठी  साडेतीन तास तर ४० गुणांसाठी सव्वा दोन तासांचा कालावधी होता.
  • मागील वर्षी परीक्षा आपापल्या शाळेत होती परंतु यावर्षी बोर्डाने निश्चित केलेल्या केंद्रावर परीक्षा असेल.
  • परीक्षेसासाठी १००% अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत.
  • प्रत्येक विषयासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा तर २० गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन होईल

SSC 10th Class – English Notes

SSC 10th Class – English Notes

नमस्कार मित्रांनो खालील बटानांवर क्लिक करून तुम्ही दहावी इंग्रजी विषयांच्या नोट्स डाउनलोड करू शकता.

लवकरच इतर नोट्स याच दुव्यावर अपलोड केल्या जातील.

Tense

Tenses (काळ )

Three Types of Tenses

1. Present Tense (वर्तमान काळ)

2. Past Tense (भूतकाळ)

3. Future Tense (भविष्यकाळ)

Present Tense

  1. Simple present Tense                           

(S+ V1 + O)

Example:            

1) He eats an apple. ( तो सफरचंद खातो )                    

2) They eat an apple. ( ते सफरचंद खातात )

  • Present Continuous Tense                   

(S + am/is/are + V + ing + O)              

Example:            

1) He is eating an apple. ( तो सफरचंद खात आहे )                  

2) They are eating an apple. ( ते सफरचंद खात आहेत )

  • Present Perfect Tense                           

(S + have/has + V3 + O)

Example:

  1. He has eaten an apple. (त्याने  सफरचंद खाल्ला आहे )       
  2. They have eaten an apple. ( त्यांनी सफरचंद खाल्ला आहे )
  • Present Perfect Continuous Tense     

(S + have/has + been + V + ing + O)

Example:

 1) He has been eating an apple. ( तो सफरचंद खात आलेला आहे )   

2) They have been eating an apple ( ते सफरचंद खात आलेले आहेत )

Past Tense

  1. Simple past Tense                                 

(S+ V2 + O)

Example:

1) He ate an apple. ( त्याने सफरचंद खाल्ला )   

2) They ate an apple. ( त्यांनी सफरचंद खाल्ला )

  • Past Continuous Tense                        

(S + was / were + V + ing + O)

Example:

1) He was eating an apple. ( तो सफरचंद खात होता )  

2) They were eating an apple. ( ते सफरचंद खात होते )

  • Past Perfect Tense                                

(S + had + V3 + O)

Example:

  1. He had eaten an apple. ( त्याने सफरचंद खाल्ला होता )      
  2. They had eaten a mango. ( त्यांनी सफरचंद खाल्ला होता )
  • Past Perfect Continuous Tense                      

(S + had + been + V + ing + O)

Example:

1) He had been eating an apple. ( तो सफरचंद खात आलेला होता )

2) They had been eating an apple. ( ते सफरचंद खात आलेले होते )

Future Tense

  1. Simple Future Tense                            

(S+ will + V1 + O)

Example:

1) He will eat an apple. ( तो सफरचंद खाईल )             

2) They will eat an apple. ( ते सफरचंद खातील )

  • Future Continuous Tense                    

(S + will be + V + ing + O)

Example:

1) He will be eating an apple.          ( तो सफरचंद खात असेल )

2) They will be eating an apple. (ते सफरचंद खात असतील )

  • Future Perfect Tense                            

(S + will have + V3 + O)

Example:

1) He will have eaten an apple. ( त्याने सफरचंद खाल्ला असेल )         

2) They will have eaten an apple. ( त्यांनी सफरचंद खाल्ला असेल )

  • Future Perfect Continuous Tense      

(S + will have + been + V + ing + O)

Example:

1) He will have been eating an apple. ( तो सफरचंद खात आलेला असेल )   

2) They will have been eating an apple. ( ते सफरचंद खात आलेले असतील )

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 वेळापत्रक जाहीर – आत्ताच डाऊनलोड करा वेळापत्रक – SSC / HSC Maharashtra Board Exam 2022 Timetable

इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 वेळापत्रक जाहीर – आत्ताच डाऊनलोड करा वेळापत्रक

SSC / HSC Maharashtra Board Exam 2022 Timetable

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकाच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्च 2022 ला सुरु होणार असून इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 ला सुरु होणार आहे. खालील दुव्यांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2022 – वेळापत्रक

दिनांकवारविषयवेळ
15 मार्च 2022मंगळवारमराठी – प्रथम भाषा 10:30 ते 2
16 मार्च 2022बुधवार मराठी – तृतीय व द्वितीय भाषा 10:30 ते 2
19 मार्च 2022शनिवार इंग्रजी 10:30 ते 2
21 मार्च 2022 सोमवार हिंदी– संयुक्त – 40 गुण10:30 ते 12:45
21 मार्च 2022सोमवार हिंदी– संपूर्ण – 80 गुण10:30 ते 2
22 मार्च 2022मंगळवारसंस्कृत– संपूर्ण – 80 गुण 10:30 ते 2
22 मार्च 2022मंगळवार संस्कृत– संयुक्त– 40 गुण 3:00 ते 5:15
24 मार्च 2022गुरुवार गणित भाग 110:30 ते 12:45
26 मार्च 2022 शनिवार गणित भाग 2 10:30 ते 12:45
28 मार्च 2022सोमवार विज्ञान भाग 110:30 ते 12:45
30 मार्च 2022बुधवार विज्ञान भाग 2 10:30 ते 12:45
1 एप्रिल 2022शुक्रवार इतिहास आणि राज्यशाश्त्र 10:30 ते 12:45
4 एप्रिल 2022सोमवारभूगोल10:30 ते 12:45

बोर्ड परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्या शाळेतील वेळापत्रक बघून खात्री करून घ्या

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 15 मार्च ला सुरु होणार असून 4 एप्रिल ला संपणार आहे. 15 मार्च ला सकाळी 10:00 ते 2 दरम्यान पहिला मराठी विषयाचा पेपर असणार असून शेवटचा पेपर हा भूगोलाचा असेल. सन २०२१ ची इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा पूर्णपणे रद्द करून अंतर्गत मूल्यमापन करून इयत्ता निकाल जाहीर झाला होता. त्याआधी 2020 मध्ये इयत्ता दहावीचा शेवटचा भूगोल पेपर रद्द झाला होता. परंतु यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा नियमित होणार आहे.

दहावी गणित भाग 1 | बोर्ड परीक्षा २०२१ प्रश्नपेढी – उत्तरे

दहावी गणित भाग 1 बोर्ड परीक्षा २०२१ प्रश्नपेढी – उत्तरे

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बोर्डाने राज्य साहिक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या वेबसाईट वर इयत्ता दहावी आणि बारावी च्या वर्गाच्या सर्व विषयांच्या सरावासाठी काही प्रश्नपेढी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही राज्य साहिक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या संकेतस्थळावर जाऊन या सर्व प्रश्नपेढ्या डाउनलोड करून सर्व विषयांचा सराव करू शकता. या प्रश्नपेढ्या सादर करत असताना दोन महत्वाच्या सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत.

पहिली सूचना अशी आहे की ही प्रश्नपेढी फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी असेल. दुसरी महत्वाची सूचना अशी आहे की सदर प्रश्नसंचातील प्रश बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त याच प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला म्हणजे आपला अभ्यास संपूर्ण झाला असे नाही तर याचबरोबर इतर प्रश्नाचा अभ्यास करणे सुद्धा गरजेचे आहे हे लक्षात घेणे सुद्धा आवश्यक आहे.

दहावी गणित 1 – प्रकरण 3 – अंकगणिती श्रेढी

दहावी गणित 1

प्रकरण 3 – अंकगणिती श्रेढी

आपण 1, 2, 3, 4 या संख्या क्रमाने लिहितो. ही संख्यांची मालिका आहे. या मालिकेत कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो. जसे 11 ही संख्या 11 व्या स्थानावर आहे. 12 ही संख्या 12 व्या स्थानावर आहे. संख्यांची दुसरी मालिका पाहू. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, … या संख्या विशिष्ट क्रमाने लिहिल्या आहेत. येथे 16 हा 4 या संख्येचा वर्ग ही संख्या 4 थ्या क्रमांकावर आहे. येथे 25 हा 5 या संख्येचा वर्ग ही संख्या 5 व्या क्रमांकावर आहे.येथे 64 हा 8 या संख्येचा वर्ग ही संख्या 8 व्या क्रमांकावर आहे. म्हणजे या ही मालिकेतील कुठली संख्या कितव्या क्रमांकावर आहे हे आपण सांगू शकतो.

नैसर्गिक संख्यांप्रमानेच विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिक असे म्हणतात. क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते त्या संख्येला पद असे म्हणतात.