MPSC वेळापत्रक २०२६ जाहीर: राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा आणि तांत्रिक सेवांच्या तारखा पहा एका क्लिकवर!
MPSC वेळापत्रक २०२६ जाहीर: राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा आणि तांत्रिक सेवांच्या तारखा पहा एका क्लिकवर!
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सन २०२६ या वर्षाचे ‘स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक’ अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जाहिराती आणि परीक्षेच्या तारखांची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर नुकतेच हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास्तही या वेळापत्रकाचा खूप फायदा होणार आहे.
या वेळापत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ नवीन परीक्षांच्याच तारखा नाहीत, तर प्रलंबित असलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या सविस्तर वेळापत्रकाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच, २०२६ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, अराजपत्रित गट-ब (Non-Gazetted) संयुक्त पूर्व परीक्षा, आणि गट-क (Combined Group C) परीक्षांच्या तारखाही स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
यावर्षी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ ही पारंपारिक आणि वर्णनात्मक पद्धतीने होणार असून 29 मार्च ते 26 एप्रिल दरम्यान असणार आहे.या परीक्षेचा निकाल हा जुलै 2026 पर्यंत लागण्याची शक्यता आहे.
माराराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – 2025 ही परीक्षा सुद्धा मे 2026 महिन्यात होणार असून या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2026 रोजी लागेल
इतर सर्व परीक्षांच्या वेळापत्रकासाठी खालील pdf डाउनलोड करा..
