दहावी बोर्ड परीक्षा | जुन्या प्रश्नपत्रिका | SSC 10th Class Maharashtra Board | Old Question Paper

दहावी बोर्ड परीक्षा | जुन्या प्रश्नपत्रिका

SSC 10th Class Maharashtra Board | Old Question Paper

खालील बटणांवर क्लिक करून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येतील.

मार्च 2023

मराठी

हिंदीसंपूर्ण

इंग्रजी

गणित भाग १

गणित भाग २

विज्ञान भाग २

इतर विषयांच्या आणि इतर काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका लवकरच अपलोड केल्या जातील. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ च्या अनुषंगाने या प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी करत असताना जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका सोडवणे महत्वाचे असते. आपण जितक्या जास्तीत जास्त आणि योग्य प्रश्नपत्रिका सोडवू तितका अधिक फायदा आपल्या सर्वांना होणार हे नक्कीच. त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी सर्व वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका या संकेतस्थळावर आपल्यासाठी अपडेट करणार आहोत.

#SSCBOARDEXAM2024TIMETABLE

आपण या प्रश्नपत्रिका वेळे लावून सोडवण्याचा प्रयत्न करावा.

Maharashtra Board Exam 2024 Timetable: Class X and XII

Maharashtra Board Exam 2024 Timetable: Class X and XII

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary conducts the board exams for Class X and XII students every year. In 2023, the class 10th board exam commenced on 2nd March 2023 and concluded on 25th March 2023, while the 12th board exam started on 21st February and concluded on 20th March.

Looking ahead to the upcoming academic year, the board exams for March 2024 are likely to begin in the first week of March. Students and parents are eagerly awaiting the release of the official timetable from the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.

For class 10 students, the exam will kick off with the Marathi subject, which is the native language of Maharashtra. The Marathi paper is often considered crucial as it sets the tone for the rest of the exams. Students will then be tested on various subjects such as Mathematics, Science, Social Sciences, and Languages. The last paper for class 10 will be on Geography, a subject that explores the Earth’s physical features, climate, and human-environment interaction.

As for class 12 students, they will face a diverse range of subjects including Physics, Chemistry, Biology, Mathematics, English, and their chosen electives. The board exams play a significant role in determining students’ future academic and career paths, making it crucial for them to prepare diligently.

In preparation for the exams, students are advised to start their studies now, allowing them ample time to revise and grasp the concepts thoroughly. Early preparation not only helps in better understanding of the subjects but also reduces stress during the exam period. By starting their studies well in advance, students will have around 7-8 months to complete the 10th standard curriculum, ensuring a comprehensive understanding of the topics.

It is anticipated that the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will release the official timetable for the Class X and XII board exams in the coming months. Students and parents are urged to stay updated with the official announcements and make a study plan accordingly to excel in the exams.

दहावी – बारावी बोर्डाची परीक्षा झाली आता निकाल कधी लागणार – लवकर की उशिरा

दहावी – बारावी बोर्डाची परीक्षा झाली आता निकाल कधी लागणार – लवकर की उशिरा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा नुकात्याच संपलेल्या आहेत. कोरोनाच्या प्रदीर्घ अडथळ्यानंतर शेवटी संपूर्ण अभ्यासक्रमवार यावर्षी परीक्षा झाल्या. परीक्षा सुरु असतानाच शिक्षकांनी पेन्शनसाठी केकेल्या संपामुळे पेपर तपासणी थांबली असून निकाल उशिरा लागण्याची शक्यता असेल अशा बातम्या आपण पेपर सुरु असतानाच ऐकल्याही असतील.

परंतु तरीही निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा असणार आहे. वेळेवर म्हणजे नेमका कधी निकाल लागेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तर मित्रांनो दरवर्षी इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात लागत असतो तर इयत्ता बारावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागत असतो. याच वेळेवर यावर्षी चे इयत्ता दहावीचे निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

बेस्ट ऑफ Five म्हणजे काय? यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार काय?

बेस्ट ऑफ Five म्हणजे काय? यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार काय?

मित्रांनो महाराष्ट्र बोर्ड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची २०२३ ची बोर्ड परीक्षा यावर्षी २ मार्च २०२३ पासून सुरु झाली आहे. तेव्हापासून मुलांना उस्तुकता लागली आहे की, यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार आहे की नाही? तसेच काही मुले अजूनही एका संभ्रमात आहेत की बेस्ट ऑफ Five म्हणजे काय?

सर्वात आधी पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊ की बेस्ट ऑफ Five या वर्षी असणार आहे काय?

उत्तर – मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून बेस्ट ऑफ Five प्रमाणे इयत्ता दहावीच्या मुलांचे टक्के काढले जातात. बेस्ट ऑफ Five प्रमाणे मुलांना गुण दिले जातात. तसेच यावर्षीही असण्याची शक्यात्ता दाट आहे. कारण यावर्षी बेस्ट ऑफ Five नसणार असे अजून बोर्डाने कुठेही सांगितले नाही.

आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बघू – बेस्ट ऑफ Five म्हणजे काय?

 • तर मित्रांनो बेस्ट ऑफ Five म्हणजे परीक्षेच्या निकालावर सहापैकी ज्या ५ विषयांत मुलाला सर्वाधिक गुण मिळालेले आहेत. त्याच्ग पाच विषयांचे गुण गृहीत धरून विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी काढली जाते.
 • यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढण्यास मदत होते.

दहावी मराठी व्याकरण | नोट्स | कुमारभारती | SSC Marathi Grammar Nots

दहावी मराठी व्याकरण | नोट्स | कुमारभारती | SSC Marathi Grammar Nots

नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसाठी मराठी विषय हा १०० गुणांचा असतो. यात २० गुण अंतर्गत मूल्यमापन तर ८० गुण हे लेखी परीक्षेचे असतात. ८० गुणांच्या लेखी परीक्षेत व्याकरणावर आधारित प्रश्न खूप महत्वाचे असतात. यामध्ये ८ गुणांसाठी व्याकरण घटकावर प्रश्न विचारले जातात तर ८ गुणांसाठी भाषिक घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. असे एकूण १६ गुण या घटकावर आधारित असतात. या प्रश्नात आपल्याला पैकी च्या पैकी गुण मिळू शकतात. खालील pdf तुम्ही डाउनलोड करून अभ्यास करू शकता.

आणखी काही मुद्द्यावरील PDF लवकरच याच लिंक वर शेअर केल्या जातील.

४. भाषाभ्यास – कृतीपात्रीकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) या भाषाभ्यासावर आधारित कृती असतात. यामध्ये

(अ) व्याकरण घटकावर आधारित कृती (८ गुण)

 • १) समास – २ गुण
 • २) शब्दसिद्धी – २ गुण
 • ३) वाक्प्रचार – ४ गुण

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

 • १) शब्दसंपत्ती – ४ गुण
 • २) लेखननियमानुसार लेखन – २ गुण
 • ३) विरामचिन्हे – १ गुण
 • ४) पारिभाषिक शब्द – १ गुण

दहावी बारावी बोर्ड परीक्षा अपडेट | कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडे आल्या तब्बल २३७ कल्पना

दहावी बारावी बोर्ड परीक्षा अपडेट | कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडे आल्या तब्बल २३७ कल्पना

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षा २०२३ च्या परीक्षेत या वर्षी कॉपी रोखण्यावर बोर्डाने खूप जास्त भर दिलेला आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करताना आढळून येतात. यावर उपाययोजना करण्यासाठी बोर्डाने या महिन्यात विद्यार्थी पालक आणो शिक्षक तसेच समाजातील इतर घटकांकडून बोर्ड परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर काही सूचना आणि आयडिया मागवल्या होत्या. २० जानेवारीपर्यंत बोर्डाकडे जवळपास २३७ आयडिया विविध माध्यमातून मिळाल्या आहेत.

या मिळालेल्या आयडिया ची आणि कल्पनांची एका तज्ञ समितीकडून लवकरच छाननी करण्यात येईल आणि या मधून निवडलेल्या निवडक कल्पनांची अंमलबजावणी या वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत केली जाईल. त्यामुळे यावर्षी कॉपी चे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

मागील काही वर्षापूर्वी सुद्धा बोर्डाने कॉपी रोखाण्य्साठी काही उपाययोजना केलेल्या होत्या. २०११ रोजी बोर्डाने २६ जानेवारी रोजी ‘मी गैरप्रकार करणार नाही’ अशी शपथ विद्यार्थ्यांकडून घेतली होती आणि कॉपी रोखण्यासाठी जागृती केली होती.

दरवर्षी बोर्ड परीक्षेच्या वेळी भरारी पथके आणि बैठी पथके कॉपी रोखण्यासाठी सज्ज असतात. यावर्षी सुद्धा अशाप्रकारची भरारी पथके कॉपी रोखण्यासाठी सज्ज असणार आहेत. तसेच यावर्षी पेपर सुरु असताना जे शिक्षक वर्गात परीक्षक म्हणून उपस्थित असतील त्यांच्या मोबाईल मध्ये झूम कॅल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तीन तास व्हिडियो रेकॉर्डिंग सुद्धा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.  

दहावी गणित | Board Exam 2023 IMP | बोर्डाला आलेले प्रश्न | महत्वाचे प्रश्न

दहावी गणित | Board Exam 2023 IMP | बोर्डाला आलेले प्रश्न | महत्वाचे प्रश्न

नमस्कार मित्रानो या पानावर इयत्ता दहावी गणित भाग एक आणि भाग दोन या विषयांच्या महत्वाच्या गणिताच्या व्हिडियो तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. खालील बटानांवर क्लिक क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडियो बघू शकता.

लवकरच पुढील व्हिडियो येथे अपडेट केल्या जातील.

यावर्षी मार्च २०२३ ची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून २५ मार्च २०२३ रोजी संपणार आहे. गणित भाग १ विषयाचा पेपर ४० गुणांचा तर गणित भाग २ या विषयाचा पेपर ४० गुणांसाठी असणार आहे. अशाप्रकारे लेखी परीक्षा ८० गुणांची असणार असून २० गुण हे अंतर्गत मूल्यमापनाचे असणार आहे. गणित भाग १ या विषयावर १० गुण तर गणित भाग २ साठी १० गुण असतील. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न आणि गृहपाठ मिळून २० गुण असतील. बहुपर्यायी प्रश्नांसाठी १० गुण तर गृहपाठासाठी १० गुण असतील. यामुळे आपले गृहपाठ आणि गृहपाठाच्या वह्या पूर्ण करून ठेवा जेणेकरून गृहपाठात आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. तसेच लेखी परीक्षेसाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करा.

बोर्ड परीक्षा २०२३ | सर्वात मोठा निर्णय | कॉपी रोखण्यासाठी विशेष उपाय

बोर्ड परीक्षा २०२३ | सर्वात मोठा निर्णय | कॉपी रोखण्यासाठी विशेष उपाय

बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्रासपणे होणारी कॉपीची प्रकरणे कशी रोखायची यासाठी बोर्डाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून एक कृती कार्यक्रम मागवलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी हा कृती कार्यक्रम आखला जाईल. बोर्डाच्या परीक्षेत अनेक ठिकाणी सर्रासपणे कॉपी ची प्रकरणे घडत असलेली आपल्याला बघायला मिळतात. हेच प्रकार कसे रोखायचे याविषयी आता शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून बोर्डाने आता कृती कार्यक्रमाची विचारणा केली आहे. बोर्ड परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी बोर्डाने आता कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.

हा कृती कार्यक्रम म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत कॉपी कशी रोखता येईल हे आता शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनीच सांगायचं आहे. यासाठी बोर्डाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तशी अपडेट केली आहे. संकेत स्थळावर बोर्डाने एक गुगल फोर्म दिलेला आहे. तो गुगल फॉर्म भरून यासंदर्भात आपल्या कृती आणि बोर्ड परीक्षेत होणारी कॉपी प्रकाराने रोखण्यासाठी तुम्हाला सुचलेल्या उपाययोजना या फोर्म मध्ये भरून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सर्व स्थरांकडून आलेल्या उपाययोजना आणि कृती कार्यक्रम पाहण्यासाठी एक तज्ञ लोकांची समिती निवडलेली आहे. ही समिती हे कृती कार्यक्रम पाहिल आणि यातले योग्य असे दहा कृती कार्यक्रम निवडले जातील आणि या दहा कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी यावर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत केली जाईल.

SSC-HSC Board Exam 2023

दरवर्षी बोर्ड काही भरारी पथकांची निवड करते. ही भरारी पथके कॉपी प्रकरणांवर आळा घालण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी सुद्धा अशी भरारी पथके असणार आहेत आणि या भरारी पथकांसोबत दहा कृती कार्यक्रमांची सुद्धा अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पेपर ला जाणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा विद्यार्थी अडचणी सापडण्याची शक्यता आहे.

पालकांना आणि शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना या कृती कार्यक्रमाच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर आपण बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन सहभाही होऊ शकता. यासाठी संकेतस्थळावर एक विशेष लिंक बनवण्यात आली आहे. या लिंक वर जाऊन तुम्ही या स्पेधेचे नियम आणि अटी बघू शकता आणि गुगल फोर्म भरून तुमच्या सुचना आणि तुम्हाला सुचलेल्या उपाययोजना तुम्ही बोईर्दल कळवू शकता आणि स्पर्धेत सहभागी होऊ शकता.

इयत्ता बारावीची (HSC Board Exam 2023) बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची (SSC Board Exam 2023)  बोर्डाची परीक्षा २ मार्च पासून सुरु होणार आहे.

दहावी – बारावी  बोर्ड परीक्षा वेळापत्रक (SSC – HSC Board Exam Timetable)

Maharashtra Board Exam 2023 | Practice Question Paper | Math | गणित सराव प्रश्नपत्रिका

Maharashtra Board Exam 2023 | Practice Question Paper | Math | गणित सराव प्रश्नपत्रिका

यावर्षी २०२३ मध्ये इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च पासून सुरु होणार आहे. पहिला पेपर मराठी विषयाचा असून शेवट भूगोल या पेपरने होणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला १०० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. तसेच मागील वर्षी आपण आपापल्या शाळेत परीक्षा दिल्या तसे यावर्षी नसेल. यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा बोर्डाने नमूद केलेल्या केंद्रावर होईल. तसेच मागील वर्षी काही अतिरिक्त वेळ पेपर लिहिण्यास देण्यात आला होता. असा वेळ यावर्षी नसेल. त्यामुळे सर्व विषयांचा सराव करणे खूप गरजेची आहे. आज मी तुम्हाला गणित गणित विषयाच्या सरावाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या प्रश्नपत्रिका देणार आहे. प्रत्येक प्रकरणावर आधारित या प्रश्नपत्रिका आहेत. प्रत्येक प्रकरणावर २० गुणांची परीक्षा असणार आहे. या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षा २०२३ मध्ये उत्तम यश मिळेल.

खलील लिंक वर क्लिक करून प्रश्नपत्रिका मिळावा

दहावी – बारावी बोर्ड परीक्षा २०२३  वेळापत्रक | SSC / HSC Maharashtra Board 10th Exam 2023 Timetable

दहावी बारावी बोर्ड परीक्षा २०२३  वेळापत्रक | SSC Maharashtra Board 10th Exam 2023 Timetable

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून २५ मार्च ला संपणार आहे. पहिला पेपर मराठी या विषयाचा असून शेवटचा पेपर भूगोल विषयाचा असणार आहे. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

दहावी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक

बारावी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक

यावर्षी च्या परीक्षेसंबंधी काही महत्वाच्या अपडेट खालीलप्रमाणे आहेत.

 • यावर्षी ८० गुणांच्या पेपरसाठी ३ तास तर ४० गुणांच्या पेपर साठी २ तासांचा कालावधी असणार आहे. मागील वर्षी ८० गुणांच्या पेपर साठी  साडेतीन तास तर ४० गुणांसाठी सव्वा दोन तासांचा कालावधी होता.
 • मागील वर्षी परीक्षा आपापल्या शाळेत होती परंतु यावर्षी बोर्डाने निश्चित केलेल्या केंद्रावर परीक्षा असेल.
 • परीक्षेसासाठी १००% अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत.
 • प्रत्येक विषयासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा तर २० गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन होईल