इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या पेपर मध्ये ,मोठ्या चुका | प्रत्येकाला मिळणार फुकटचे ६ गुण

इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या पेपर मध्ये ,मोठ्या चुका | प्रत्येकाला मिळणार फुकटचे ६ गुण

Advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या पेपर मध्ये मोठ्या चुका दिसून आल्या या चुकांमुळे बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट सहा गुण फुकटचे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली. पहिला पेपर हा इंग्रजी विषयाचा होता. परंतु याच विषयाच्या प्रश्नपत्रिकेत काही चुका दिसून आल्या. या चुका छपाई करत असताना झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये प्रश्न क्रमांक 3 रा हा कवितेवर आधारित असतो. यातील उपप्रश्न A3 आणि A5 या क्रमांकाचे प्रश्न राज्य मंडळाकडून छापण्यात आले नाही. यामुळे बोर्डाचा पहिलाच पेपर लिहित असताना विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गोंधळून गेले असलेले दिसून आले. तसेच प्रश्न क्रमांक A4 या प्रश्नाऐवजी त्याचे उत्तरच छापून आल्याचे दिसून आले. हे तीनही प्रश्न प्रत्येकी तीन गुणांचे असून एकूण सहा गुण विद्यार्थ्यांना मिळू शकतात.

याशिवाय प्रश्न क्रमांक 3 – B  मध्ये सुद्धा काही चुका असल्याचे संगण्यात येत आहे. या प्रश्नात कवितेचे Appreciation लिहायचे असते. हे लिहित असताना प्रश्नपत्रिकेत Appreciation साठीचे मुद्दे देणे गरजेचे आहे. परंतु हे मुद्दे सुद्धा दिले गेले नव्हते त्यामुळे विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडालेला दिसला.

याबाबत राज्य मंडळास (Maharashtra Board) विचारणा केली असता,“प्रश्नपत्रिकेत छपाईची चूक झाल्याचे खरे आहे. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य मंडळाला नाही, तर परीक्षेच्या नियामकांकडून याबाबत अहवाल मागविण्यात येईल. त्यांच्या अहवालात प्रश्नपत्रिकेत चूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा गुण दिले जातील.” असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.

Advertisement