१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: निकाल लागण्यापूर्वीच ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू! 🔥 | FYJC Admission 2026
१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: निकाल लागण्यापूर्वीच ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू! 🔥 | FYJC Admission 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा या वर्षी लवकर सुरु होत आहे. २० फेब्रुवारी पासून यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु होणार आहे. पहिला पेपर मराठीचा असून १७ मार्च या तरलेखा भूगोलाचा शेवटा पेपर असणार आहे.

दहावीची परीक्षा अजून सुरु झाली नसली तरी बोर्डाकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक मोठो घोषणा करण्यात आली आहे. मागील वर्षी १३ मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागला होता. या निकालानंतर लगेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती. परंतु अनके विद्यार्थ्यांना अकरावीच्या या online प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचणी आल्या होत्या.
यामुळे यावर्षी ही अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर घेण्याचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने घेतला आहे. यावर्षी दहावीची परीक्षा झाल्यावर लगेच अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु होणार आहे. नेमकी तारीख आणि प्रक्रिया काय असेल यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.
