महाराष्ट्रात १७०० पेक्षा जास्त पदांसाठी तलाठी भरती | Syllabus
लवकरच महाराष्ट्रात १७०० पेक्षा जास्त पदांसाठी यावर्षी तलाठी भरती होणार आहे. अजूनपर्यंत अधिकृत परीक्षेची तारीख जाही झाली नसली तरीही येत्या काळात लवकरच ही तारीख जाहीर होणार आहे.
याआधी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या काळात तलाठी भरती झाली होती. ययांत सुमारे 3 वर्ष तलाठी भारती झाली नाही. त्यामुळे यावर्षी तलाठी भारती होणार आहे, यासाठी महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच यांसंदर्भात तारखा जाहीर करण्यात येतील.
तलाठी भरती २०२६ च्या परीक्षेसाठीचा सविस्तर अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे. ही परीक्षा साधारणपणे टीसीएस (TCS) किंवा आयबीपीएस (IBPS) पॅटर्ननुसार घेतली जाते.
या परीक्षेत एकूण १०० प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला २ गुण याप्रमाणे एकूण २०० गुणांची ही परीक्षा असते.
१. मराठी (२५ प्रश्न – ५० गुण)
व्याकरण: नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, काळ व काळाचे प्रकार, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार.
शब्दसंग्रह: समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
वाक्प्रचार व मणी: वाक्प्रचार व मणी यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग.