पंडित जसराज | Pandit Jasraj

पंडित जसराज

भारतातील महान शास्त्रीय गायक. ज्याच्या गायीकीची पकड ही भारतीयाच नाही तर जगभरातील रसिकांच्या मनावर आहे. अशा पंडित जसराज यांचे नुकतेच निधन झाले आहे. पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी हरियाना राज्यातील हिसार जिल्ह्यामधील ‘पिली मांडोरी’ या छोट्याश्या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ‘पंडित मोतीराम’ असून हे हि शास्त्रीय गायक होते. पंडित जसराज हे फक्त चार वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

पंडित जसराज यांनी आपल्या संगीताची आराधना गुजरात मधील सानंद येथे मेवाती घराण्याच्या तालमीमध्ये केली. आपल्या संगीत शिक्षणाची सुरुवात त्यांनी ताब्ल्यापासून केली आणि पुढे त्यांनी आपला ताफा गायनाकडे वळवला. त्यांच्या आवाजात एक मधुरता होती. एक प्रकारची जादू होती. त्यांचा आवाज रसिकांच्या मनावर मोहिनी घालत असे. पंडित जसराज हे असे शास्त्रीय गायक होते कि ज्यांनी अमेरिकेला जाऊन शास्त्रीय गायनात खूप मोठं काम केल होतं.

संगीतातील विवध प्रकारावर त्यांनी काम केल आहे. संशोधन केल आहे. संगीतातील अनेक प्रकारांचा त्यांनी अभ्यास केला आहे. हवेली संगीत हे मंदिरात गायले जात असत. पंडित जसराज यांनी हवेली संगीत मंदिरातून मंचावर आणले. पंडित जसराज यांचे आपल्या शिष्यांवर खूप प्रेम होते. ते एक आदर्श गुरु होते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते आपल्या शिष्यांना शिकवत होते. दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यानाही ते ऑनलाईन शिकवत होते. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला ते अगदी आपल्या घरी आणून शिकवत. आपल्या शिष्यांसोबत मैफिलीत ते रंगून जात असत. आपल्या शिष्यांना ते नेहमी प्रोत्साहन देत असत.

भारतीय सांगितला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘इंडियन म्युसिक अकेडमी’ ची स्थापना केली. यातून त्यांनी तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार

  1. पद्मश्री
  2. पद्मभूषण
  3. पद्मविभूषण
  4. उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार, हावर्ड विद्यापीठ
  5. आर्टीस्ट ऑफ अमेरिका पुरस्कार
  6. संगीत सम्राट पुरस्कार, न्यूयार्क    
Advertisement