दहावी बोर्ड परीक्षा २०२६: हॉल तिकीट ‘या’ तारखेपासून मिळणार; MSBSHSE कडून मोठी अपडेट
दहावी बोर्ड परीक्षा २०२६: हॉल तिकीट ‘या’ तारखेपासून मिळणार; MSBSHSE कडून मोठी अपडेट
दहावी बोर्ड परीक्षा 2026 : Hall Ticket Update

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचे Hall ticket विद्यार्थ्यांना 20 तारखेपासून शाळेत मिळणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशपत्रे २० जानेवारी २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांनी ही प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in, http://www.mahahsscboard.in वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले. त्यामुळे 20 जानेवारी पासून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश पत्रे मिळतील
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मंगळवारपासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे संबंधित माध्यमिक शाळांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत.
प्रवेशपत्र छापताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये. छापील प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करणे आवश्यक असल्याचे शिक्षण मंडळाने कळवले आहे.
इयत्ता बारावीची प्रवेश पत्रे मागील आठवड्यापासून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होत असल्यामुळे hall ticket सुद्धा लवकर देण्यात येत आहे.
