दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2026 | वेळापत्रक आले | आत्ताच डाउनलोड करा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाहीर वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून, तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून राज्यभर एकाचवेळी सुरू होणार आहे.
या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतल्या जाणार आहेत.
लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक (Practical), मौखिक (Oral) आणि अंतर्गत मूल्यमापन (Internal Assessment) परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, त्यांचेही वेळापत्रक मंडळाने प्रसिद्ध केले आहे.
