इयत्ता दहावी मराठी व्याकरण | Online Test | समास
इयत्ता दहावी मराठी व्याकरण | Online Test | समास
नमस्कार मित्रांनो,
आपण या लेखामध्ये इयत्ता दहावी व्याकरणावरील सर्व महत्वाच्या घटकांवर चर्चा करणार आहोत आणि या घटकांवरील काही online टेस्ट तुम्ही येथे देऊ शकता. या online टेस्ट देण्यासाठी खालील बटानांवर क्लिक करा.

पाठ्यपुस्तकातील भाषाभ्यास’ या शीर्षकाखाली आलेल्या व्याकरण घटकांवर आधारित पुढीलप्रमाणे कृती विचारल्या जातील:
समास: (2 गुण)
(1) सामासिक शब्द व समासाचे नाव यांच्या जोड्या लावा.
(2) सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.
(3) विग्रहावरून सामासिक शब्द लिहा.
(4) समासाच्या नावावरून सामासिक शब्द लिहा इत्यादी.
समास – जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला ‘समास’ असे म्हणतात.
(१) कर्मधारय समास: या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम यांचा समावेश होऊन एक शब्द तयार होतो. या शब्दांच्या एकीकरणाला कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा : सामासिक शब्द विग्रह
नीलकमल नील असे कमल
महाराष्ट्र महान असे राष्ट्र
नरसिंह सिंहासारखा नर
(२) द्वंद्व समास – या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्व देण्यात येतो. जेव्हा समान प्राधान्य असलेले दोन शब्द एकत्र येऊन नविन जोडशब्द तयार होतो तेव्हा त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. या समासाचे तीन प्रकार पडतात.
(१) इतरेतर द्वंद्व समास:
उदा : सामासिक शब्दविग्रह
आईवडील आई आणि वडील
रामलक्ष्मण राम आणि लक्ष्मण
(२) वैकल्पिक द्वंद्व समास:
उदा : सामासिक शब्दविग्रह
खरेखोटे खरे किंवा खोटे
बरेवाईट बरे किंवा वाईट
(३) समाहार द्वंद्व समास:
उदा : सामासिक शब्द विग्रह
गप्पागोष्टी गप्पा, गोष्टी वगैरे
मीठभाकर मीठ, भाकर वगैरे
(३) द्विगू समास: या समासामध्ये पहिले पद हे संख्याविशेषण असते. म्हणुनच या समासाला द्विगू समास म्हणतात.
उदा:
सामासिक शब्दविग्रह
नवरात्रनऊ रात्रींचा समूह
चौकोन चार कोनांचा समूह
