दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2026 | प्रॅक्टिकल परीक्षेचा ‘टेंशन’ वाढलं! बोर्डाची मोठी अपडेट.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2026 | प्रॅक्टिकल परीक्षेचा ‘टेंशन’ वाढलं! बोर्डाची मोठी अपडेट.
महारष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरु होत आहे. याआधी प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी पासूनच सुरु होत आहे. तसेच बारावीचे hall ticket विद्यार्थ्यांना मिळाले असून इयत्ता दहावीचे hall ticket मंगळवार दिनांक 20 तारखेपासून विद्यार्थ्यांच्या हातात यायला सुरुवात होईल.

हे सर्व सुरु असताना दहावी बारावीच्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसंबंधी एक मोठी अपडेट समोर येत आहे. दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शी ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली जाते. परंतु यावर्षी दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सुद्धा भरारी पथके असणार आहेत. अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांसाठी नवीन नियमावली:
भरारी पथकांची नियुक्ती: लेखी परीक्षेप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षांमध्येही पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंडळाने प्रथमच भरारी पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे
तपासणी आणि पुरावे: ही भरारी पथके शाळांमधील प्रयोगशाळांची पाहणी करतील. परीक्षा सुरू असताना प्रयोगशाळांची छायाचित्रे, विद्यार्थ्यांची जर्नल्स आणि विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग करतानाचे फोटो मंडळाकडे पाठवणे आता बंधनकारक असेल.
तंत्रज्ञानाचा वापर: परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे असणे अनिवार्य करण्यात आले आहे.परीक्षेदरम्यान शाळेच्या परिसरावर ड्रोनद्वारे (Drone) नजर ठेवली जाणार आहे
