१० वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; मिळणार मोफत टॅबलेट आणि स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण!
नागपूर | १७ एप्रिल २०२६
१० वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; मिळणार मोफत टॅबलेट आणि स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण!
नागपूर | १७ एप्रिल २०२६

योजनेसाठी पात्रता आणि अटी: या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत:
आरक्षण आणि निवडीची पद्धत: या योजनेत सामाजिक प्रवर्गानुसार जागांचे वाटप करण्यात आले असून, यात ओबीसी प्रवर्गासाठी ५९% जागा राखीव आहेत. तसेच, समांतर आरक्षणानुसार महिलांसाठी ३०%, दिव्यांगांसाठी ४% आणि अनाथांसाठी १% जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या १० वीच्या परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीनुसार केली जाईल.
असा करा अर्ज: इच्छुक विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahajyoti.org.in) जाऊन ‘Notice Board’ मधील संबंधित लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मे २०२६ पर्यंत आहे.
आवश्यक कागदपत्रे: अर्ज भरताना आधार कार्ड, रहिवासी दाखला (Domicile), जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आणि १० वीची गुणपत्रिका ही कागदपत्रे स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थी महाज्योती कॉल सेंटरच्या ०७१२-२८७०१२०/२१ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ही योजना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक मोठे पाऊल मानले जात आहे.
