दहावी मराठी व्याकरण | वाक्प्रचार | Online Test आणि संकल्पना
इकडे विशेष लक्ष दया :
दहावी मराठी व्याकरण | वाक्प्रचार | Online Test आणि संकल्पना
इकडे विशेष लक्ष दया :
(१) पाठ्यपुस्तकातील पाठांतील वाक्प्रचारांवर आधारित ही कृती आहे.
(२) प्रत्येक पाठातील दोन वाक्प्रचार अर्थासहित लक्षात ठेवा. तुम्हांला कठीण वाटणारे वाक्प्रचार अर्थांसह पाठ करा.
(३) वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करणे आवश्यक, अर्थांचा नव्हे.
काही महत्वाचे वाक्प्रचार
१) डोळे विस्फारून बघणे-
अर्थ – डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे
वाक्य – कधीही अभ्यास न करणारा राहुल आज समोर येऊन मोठ्या मोठ्याने पाढे म्हणणाऱ्या सागर – कडे संपूर्ण वर्ग डोळे विस्फारून बघत होता..

२) तगादा लावणे-
अर्थ – पुन्हा पुन्हा विचारणे
वाक्य- परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाल्यावर नवीन सायकल घेण्यसाठी सायलीने आईकडे तगादा
लावला.
३) तुळशीपत्र ठेवणे –
अर्थ – त्याग करणे
वाक्य – भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकर आणि त्यांच्या बंधूनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले.
४) गहिवरून येणे-
अर्थ- मन भरून येणे
वाक्य – लग्नाच्या दिवशी आपल्या मुलेला निरोप देताना प्रत्येक आईबाबांना गहिवरून येते.
५) खाद्यांला खांदा लावणे
अर्थ – सहकार्य करणे
वाक्य – खाद्यांला खांदा लावून गावक-यांनी स्वच्छता अभियान पूर्ण केले.
६) माश्या मारणे
अर्थ – निरोद्योगी असणे
वाक्य – काही कामधाम न करणारा आळशी मनोहर सध्या माश्या मारत बसला आहे.
७) खस्ता खाणे-
अर्थ – खूप कष्ट करणे
वाक्य – आपल्या मुलांसाठी माता नेहमी खस्ता खात असते.
८) डंका वाजवणे
अर्थ – अवाजवी गाजावाजा करणे
वाक्य – थोड्याशा यशाचा डंका वाजवणे गैर आहे.
९) डोळे विस्फारून बघणे
अर्थ- आश्चर्याने बघणे
वाक्य – समोरच्या बेफाट सुंदर दृश्याकडे मिताली डोळे विस्फारून बघत राहिली.
१०) तुळशीपत्र ठेवणे
अर्थ – त्याग करणे
वाक्य- संसाराचा त्याग करून संन्यास घेतलेल्या स्वामींनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले.
११) गहिवरून येणे
अर्थ – मन दुःखाने दाटुन येणे, ऊर भरून येणे
वाक्य – बऱ्याच वर्षांनी माहेरी आलेल्या लेकीला पोटाशी धरताना माईना गहिवरून आले.
१२) तावडीत सापडणे
अर्थ – कचाट्यात सापडणे
वाक्य- अनेक चोऱ्या करणारा इसम अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.
१३) झोपमोड होणे
अर्थ- मध्ये मध्ये जाग येणे.
वाक्य – बाहेर मुलांच्या कलकलाटामुळे दुपारी निवांत झोपलेल्या आईची झोपमोड झाली.
१४) चेंदामेंदा करणे
अर्थ- कुटुन काढणे
वाक्य- अचानक शेतात शिरलेल्या सापाचा गण्याने दगडाने ठेचून चेंदामेंदा केला.
१५) कित्ता गिरवणे
सराव करणे, अनुसरणे.
वाक्य – गुरुजींनी दिलेल्या गुरुमंत्राचा संकेत नेहमी कित्ता गिरवतो.
१६) तोंडसुख घेणे
अर्थ – खूप बडबडणे.
वाक्य – घरात नवीन आलेल्या सुनेवर शेजारच्या रमाबाई नेहमी तोंडसुख घेतात.
१७) कसब दाखवणे
अर्थ – कौशल्य दाखवणे.
वाक्य – वीस फुटी शिल्प पडवताना मूर्तीकाराने आपले सर्व कसब दाखवले.
१८) हातात हात असणे
अर्थ – सहकार्य करणे.
वाक्य- हातात हात घालून गावकऱ्यांनी एका दिवसात पडकी विहीर बांधून काढली.
१९) गुडघे टेकवणे
अर्थ – शरण येणे,
वाक्य- राजूच्या दररोजच्या खोड्यांनी व शेजाऱ्याच्या तक्रारीसमोर त्याच्या आईने गुडघे टेकवले.
२०) खनपटीला बसणे
अर्थ – सारखे विचारत राहणे.
वाक्य – ब-याच दिवसांनी गावावरून आलेली राधिका मावशीच्या खनपटीलाच बसली.
