दिवाळीचा पहिला दिवस: धनत्रयोदशी | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचा पहिला दिवस: धनत्रयोदशी | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज आपण दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवसाविषयी जाणून घेणार आहोत. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी हा सण आपण साजरा करतो. धनत्रयोदशी या शब्दातील पहिल्या दोन अक्षराने तयार होणारा शब्द म्हणजे धन आणि या धनाची पूजा धनत्रयोदशी या दिवशी आपण करतो. धनासोबत आरोग्याचंही पूजन आज केलं जातं.

या दिवशी घराची स्वच्छता केली जाते. आपण संपूर्ण घरात साफसफाई करतो सजावट करतो आणि संध्याकाळी धन्वंतरि देवतेची पूजा केली जाते कारण या दिवशी धन्वंतरि यांचा अवतार झाला होता, त्यामुळे आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.
व्यापारी वर्गासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो सोनं, चांदी, भांडी अशा वस्तूंची खरेदी या दिवशी आवर्जून केली जाते. या दिवशी घरात आणि संपूर्ण घराच्या परिसरात आपण सुंदर सुंदर रांगोळ्या काढतो, घराच्या दरवाजासमोर, अंगणात, खिडकीत सर्वत्र दिवे लावतो आणि धनलक्ष्मीचे पूजन करतो.
अशा या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशी संदेश – मराठी

शुभ दीपावली – मराठी image

शुभ दिवाळी – मराठी

