दहावी मराठी व्याकरण | शब्दसंपत्ती | Online Test आणि संकल्पना
दहावी मराठी व्याकरण | शब्दसंपत्ती | Online Test आणि संकल्पना
पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायांत आलेल्या भाषिक घटकांवर आधारित पुढीलप्रमाणे कृती देण्यात येतील.
(i) समानार्थी शब्द लिहा.
(ii) विरुद्धार्थी शब्द लिहा.
(iii) एकवचन/अनेकवचन लिहा/ओळखा.
(iv) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
(v) शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
1.ज्याला होणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
2.महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे – मासिक
3.ज्याचे आकलन होत असे – अनाकलनीय
4.डोंगरावर चढणे – गिर्यारोहण
5.ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे असा – बहुश्रुत
6.मंदिराच्या आतील भाग – गाभारा
7.केलेले उपकार न जाणणारा – कृतघ्न
8.लिहिता – वाचता येणारा – साक्षर
9.देवाचे अस्तित्व मानणारा – आस्तिक
10. चागल्या प्रकारे शिक्षित असलेला – सुशिक्षित
समानार्थी शब्द लिहा
1) रात्र = निशा / रजनी
2) वाट = रस्ता / मार्ग
3) शक्ती = सामर्थ्य / ताकद
4) सूर्य = रवी
5) चंद्र = शशी
6) सागर = समुद्र
7) नदी = सरिता
8) पृथ्वी = अवनी / वसुंधरा
9) माता = आई
10) मुख = तोंड
11) गोड = मधुर
12) पान = पर्ण
13) काया = शरीर
14) कष्ट = श्रम
15) आयुष्य = जीवन
16) आकाश = गगन
17) शाळा = विद्यालय
विरुद्धार्थी शब्द
1) जवळ – लांब / दूर
2) सरुवात – अंत / शेवट
3) समानता – असमानता
4) जमा – खर्च
5) सुंदर – कुरूप
6) मित्र – शत्रू
7) आस्तिक – नास्तिक
8) खरे – खोटे
9) जन्म – मृत्यू
10) दिवस – रात्र
11) खात्री – शंका
12) गुण – अवगुण
13) सूर्योदय – सूर्यास्त
14) सजातीय – विजातीय
15) कृपा – अवकृपा
16) अल्पायुषी – दीर्घायुषी
17) अवरोह – आरोह
18) आदर – अनादर
19) आस्था – अनास्था
20) दुमत – एकमत
21) नापीक सुपीक
दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे
1.विनायक – नाक , विक, नायक
2.बालपण – बाण, लप, बाप, बाल, पण
3.तुकाराम – राम, काम, तुरा
4.महाराज – महा, राज, राम, जरा
5.कुशलधाम – कुशल, धाम, कुल
6.जीवनात – जीव, नात, जिना, जीत,वनात, नाव
7.नसतात – नस, तास, तन
8.विश्वासघात – विश्वास, घात, वित, श्वास
