दहावी मराठी व्याकरण | शब्दसिद्धी | Online Test
दहावी मराठी व्याकरण | शब्दसिद्धी | Online Test
नमस्कार मित्रांनो,
खालील बटनावर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी व्याकरण – शब्दसिद्धी या घटकाची online टेस्ट देऊ शकता.

शब्दसिद्धीचे प्रकार
(१) उपसर्गघटित शब्द :
मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात, त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात.
आधी लागणा-या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात.
उदा : उपसर्ग + मूळ शब्द = उपसर्गघटित शब्द
(१) सु + विचार = सुविचार
(२) गैर + समज = गैरसमज
(३) यथा + शक्ती = यथाशक्ती
(४) गैर + समज = गैरसमज
(२) प्रत्ययघटित शब्द :
मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.
नंतर लागणा-या शब्दांना प्रत्यय म्हणतात.
उदा : मूळ शब्द + प्रत्यय = प्रत्ययघटित शब्द
(१)रस + इक = रसिक
(२)बुद्धि + मान = बुद्धिमान
(३) दुकान + दार = दुकानदार
(४) माणूस + की = माणूसकी
(३) अभ्यस्त शब्द :
एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावुत्ती होणे, अशा प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात.
उदा : (१) पूर्णाभ्यस्त – क्षणक्षण, जवळजवळ
(२) अंशाभ्यस्त – आसपास, उभाआडवा
(३) अनुकरणवाचक – कडकड, बडबड
