SBI CBO Recruitment 2026 | स्टेट बँकेत २,२७३ अधिकारी पदांची मोठी भरती! | Apply Now
SBI CBO Recruitment 2026 | स्टेट बँकेत २,२७३ अधिकारी पदांची मोठी भरती! | Apply Now
स्टेट बँकेत अधिकारी २,२७३ पदांची मोठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एकूण २,२७३ पदांची भारती होणार आहे. नुकतीच ‘सर्कल बेस्ड ऑफिसर्स’ (CBO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल २,२७३ पदांची भारती होणार आहे. यामुळे पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘सर्कल बेस्ड ऑफिसर्स’ (CBO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे देशभरातील १६ सर्कल्समध्ये एकूण २,२७३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात २,०५० नियमित पदे आणि २२३ बॅकलॉग पदांचा समावेश आहे.
महाराष्ट्रासह गोवा, हैद्राबाद, भोपाळ, जयपूर आणि बेंगळुरू या ठिकाणी ही भाती होणार आहे.

या भारतीद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांची माहिती
महाराष्ट्र (स्थानीय भाषा – मराठी): १९४ पदे (अजा-२९, अज-१४, इमाव-५२, ईडब्ल्यूएस-१९, खुला-८०).
मुंबई मेट्रो (महाराष्ट्र/गोवा) (मराठी/कोंकणी): १४३ पदे.
भोपाळ (मध्य प्रदेश/छत्तीसगड): ९७ पदे.
बेंगळुरू (कर्नाटक): २०० पदे.
जयपूर (राजस्थान): १०३ पदे.
हैदराबाद (तेलंगणा): ८० पदे.
वरील माहिती पाहिल्यास असे लक्षात येईल की महाराष्ट्रात सर्वाधिक पदांची भरती होणार आहे
पात्रता आणि अटी:
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी (Degree) उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुभव: शेड्युल्ड कमर्शियल बँक किंवा रिजनल रुरल बँकेमधील ‘ऑफिसर’ पदावरील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षे दरम्यान असावे.
- निवड पद्धती: ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे निवड केली जाईल.
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज शुल्क: रु. ७५०/-.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ फेब्रुवारी २०२६.
- संकेतस्थळ: https://bank.sbi/web/careers/current-openings.
महाराष्ट्र राज्यातील परीक्षा केंद्रे:
अमरावती,
अहिल्यानगर,
छ. संभाजी नगर,
कोल्हापूर,
जळगाव,
लातूर,
नाशिक,
नांदेड,
सातारा,
पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/MMR,
धुळे ,
सांगली,
नागपूर
