इयत्ता दहावी मराठी व्याकरण | online Test | विरामचिन्हे
इयत्ता दहावी मराठी व्याकरण | online Test | विरामचिन्हे
नमस्कार मित्रांनो, खालील बटनावर क्लिक करून तुम्ही दहावी मराठी व्याकरणातील विरामचिन्हे या घटकावर online टेस्ट देवू शकता
कृतीचे स्वरूप :
(१) कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (आ) (३) ही विरामचिन्हांवर आधारित कृती असेल. यात १ गुणासाठी बहुधा दोन कृती विचारल्या जातील.
(२) या कृतीमध्ये- (१) चिन्हांवरून नावे ओळखणे (२) नावांवरून चिन्हे देणे (३) जोड्या लावा (४) वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा वापर करा इत्यादीपैकी कृती विचारल्या जातील.
(३) वाक्ये पाठ्यपुस्तकातील गद्यपाठामधीलच असतील.
(४) प्रत्येक अचूक विरामचिन्हासाठी किंवा विरामचिन्हाच्या नावासाठी १/२ गुण. एकूण गुण १.

महत्वाची विरामचिन्हे –
(१) पूर्णविराम ( . )
(२) अर्धविराम ( ; )
(३) स्वल्पविराम ( , )
(४) अपूर्णविराम ( : )
(५) प्रश्नचिन्ह ( ? )
(६) उद्गारचिन्ह ( ! )
(७) अवतरणचिन्ह ( ‘ ’ / “ ” )
(८) अपसरण चिन्ह ( – )
(९) संयोगचिन्ह ( – )
प्रश्न २ रा – पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून लिहा:
(1) कंपनीने आम्हांला सांगितलं, “यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला अडीच ऐवजी पाच रुपये पडतील.”
उत्तर – १) स्वल्पविराम ( , ) (२) दुहेरी अवतरणचिन्ह (“ ”) (३) पूर्णविराम ( . )
(2) “आता कसं बोललात?” ते म्हणाले.
उत्तर – १) प्रश्नचिन्ह ( ? ) (२) दुहेरी अवतरणचिन्ह (“ ”) (३) पूर्णविराम ( . )
प्रश्न ३ रा
पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
(i) ओहो किती सुंदर दृश्य आहे ते
उत्तर – ओहो! किती सुंदर दृश्य आहे ते!
(ii) तो म्हणाला तुला काही कळलं की नाही
उत्तर – तो म्हणाला, “तुला काही कळलं की नाही ?”
(iii) तिला म्हटले कव्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही
उत्तर – तिला म्हटले, “कर्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही?”
(iv) आपण आपल्या आईशी बहिणीशी बायकोशी कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो
उत्तर – आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो.
