दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2026 | वेळापत्रक तारखा जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा 2026 च्या संभाव्य तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती परंतु यावर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा एक दिवस आधी सुरू होत आहे. म्हणजेच इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 20 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू होईल आणि 18 मार्च 2026 रोजी बोर्डाच्या परीक्षेचा शेवटचा पेपर असेल.

इयत्ता दहावीचा पहिला पेपर हा मराठीचा असेल आणि शेवटचा पेपर हा भूगोलाचा असेल. 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2020 दरम्यान दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होतील.
याच प्रमाणे इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 या तारखेला सुरू होईल आणि 18 मार्च 2020 या तारखेला इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा संपेल.
