दहावी मराठी व्याकरण | लेखन नियमानुसार लेखन | online Test
दहावी मराठी व्याकरण | लेखन नियमानुसार लेखन | online Test
इयत्ता दहावी मराठी व्याकरण – लेखननियमानुसार लेखन या घटकावर online टेस्ट तुम्ही खाली देवू शकता
प्रश्न 4 था – आ
या प्रश्नामध्ये कृती 2 ही शुद्धलेखनावर विचारली जाईल.
1.चार शब्दरूपांच्या गटात 1 शुद्ध शब्द दिला जातो.
2.एका वाक्यात 2 अशुद्ध शब्द दिले जातात.
शब्द गटातील अचूक शब्द ओळखून काढणे किंवा वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे अपेक्षित आहे.

प्रत्येक अचूक शब्दास ½ गुण. एकूण 2 गुण
प्रश्न 1 – अचूक शब्द निवडा
१) आधूनिक / आधुनिक / आधुनीक / आधूनीक – आधुनिक
२) दीपावली / दिपावली / दिपावलि / दीपावलि – दिपावली
३) परिक्षा / परीक्श / कारीकशा / परीक्षा – परीक्षा
४) नीर्जीव / निर्जीव / नीरजीव / निर्जिव / नीर्जिव – निर्जीव
५) हर्दिक / हार्दिक / हारदीक / हार्दीक – हार्दिक
६) पूरस्कार / पुरस्कार / पूरसकार / पुरसकार – पुरस्कार
प्रश्न 2 रा – पुढील वाक्ये लेखननियमानुसार लिहा
1.पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात – पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात.
2.एकदा त्यांना विचीत्र अनूभव आला. – एकदा त्यांना विचित्र अनुभव आला.
3.पाटी काली कुलकुलीत झाली. – पाटी काळी कुळकुळीत झाली.
4.मानवि जीवन वीसंवादी झाले – मानवी जीवन विसंवादी झाले.
5.दुरवर जंगलातून येणारा लाकुडतोड्या दिसला. – दुरवर जंगलातून येणारा लाकूडतोड्या दिसला.
