AAI भरती 2026: असोसिएट कन्सल्टंट पदांसाठी 30 जागा, पगार 70,000 रुपये
AAI भरती 2026: असोसिएट कन्सल्टंट पदांसाठी 30 जागा, पगार 70,000 रुपये
भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या AAI म्हणजे एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून असोसिएट कन्सल्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या दोन विभागांमध्ये ही भारती असून एकूण ३० पदांसाठी ही भरती असणार आहे. इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल पदासाठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी आवश्यक असून, सिव्हिल पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक आहे याचप्रमाणे या पदांच्या निवडीसाठी संबंधित क्षेत्रामध्ये कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या वयोमर्यादा ३० आहे म्हणजे उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा अधिक असता कामा नये. या पदासाठी निवड झाल्यास तब्बल ७०,००० रुपये इतका पगार दरमहा असेल. निवड झाल्यास नवी दिल्ली येथील एएआय कॉर्पोरेट मुख्यालयात काम करावे लागेल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी aai.aero या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या रजिस्ट्रेशन लिंकद्वारे १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. भरती प्रक्रियेसंदर्भातील शंका किंवा अधिक माहितीसाठी hrhelpdesk@edcil.co.in
या ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक तपशील खालीलप्रमाणे आहे.
(१) असोसिएट कन्सल्टंट (इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल) – १५ पदे.
पात्रता – इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी.
(२) असोसिएट कन्सल्टंट (सिव्हिल) – १५ पदे.
पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग.
दोन्ही पदांसाठी अनुभव – संबंधित इंजिनिअरिंग कामाचा २ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – (१ फेब्रुवारी २०२६ रोजी) ३० वर्षे.
एकत्रित वेतन दरमहा – रु. ७०,०००/-
कामाचे ठिकाण – एएआय कॉर्पोरेट मुख्यालय, नवी दिल्ली.
शंका / माहिती – hrhelpdesk@edcil.co.in
या ई-मेल आयडीशी संपर्क साधावा.
ऑनलाईन अर्ज – aai.aero या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन लिंकमार्फत १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करावे.
