वसुबारस | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
वसुबारस | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Images in Marathi
खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात वसुबारस या सणाने होते. वसुबारस हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे. गाई आणि वासराची पूजा आपण या दिवशी करतो. ‘वारसाची बारस’ असा वसुबारस या शब्दाचा अर्थ होतो. म्हणूनच आपण या दिवशी गाई आणि वासराची पूजा करतो. तसे भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्व आहे. गाईला आपण देवाचे स्थान दिले आहे. याच पवित्र गाई आणि वासराची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.

या दिवशी घरातील स्त्रिया गाईला माता मानून तिला हार, फुले, हळद-कुंकू अर्पण करतात आणि तिची आरती करून आशीर्वाद घेतात. गाय हे समृद्धी आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे वसुबारशीला शेतकरी आणि गोरक्षण करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक गाईचे दूध, तूप, दही यांचा वापर करून सण साजरा करतात.
दिपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस…’गाय’ ही भारतीय संस्कृती व शेतीचा आधारस्तंभ आहे, त्यांचे पालनपोषण करणे आपले कर्तव्य आहे. वसुबारस निमित्त पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया!


