तलाठी भरती परीक्षा 2026 | अभ्यासक्रम | Talathi Bharati Exam 2026 | Syllabus
यावर्षी 2026 मध्ये १७०० पेक्षा अधिक पदांसाठी तलाठी भारती परीक्षा होणार आहे. परीक्षा होणार हे नल्ली असले तरी अजून परीक्षेची तारीख जाहीर जाही नाही तसेच online फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरु झाली नाही. परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यावर आणि या निवडणुकीच्या निकालानंतर या परीक्षेच्या तारखा जाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तलाठी भरती 2026 परीक्षेसाठी साठी असलेल्या अभ्यासक्रमवार आपण आपल्या आयच्या लेखामध्ये चर्चा करणार आहोत. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी आपण अभ्यासाची तयारी सुरु करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपला अभ्यास चांगला होईल. या परीक्षेत 200 गुणांचा एक पेपर असून या पेपरमध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान यातील प्रत्येक घटकावर 25 – 25 प्रश्न विचारले जातात. एकूण 100 प्रश्न या पेपरसाठी असतात. एका प्रश्नाला 2 गुण अशी 200 गुणांची ही परीक्षा असते.

