बारावी बोर्ड परीक्षा | इतिहास प्रश्न पत्रिका PDF | 12th (HSC) History Board Exam Question Paper PDF
बारावी बोर्ड परीक्षा | इतिहास प्रश्न पत्रिका PDF | 12th (HSC) History Board Exam Question Paper PDF
नमस्कार मित्रांनो खालील बटानांवर क्लिक करून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. खाली आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या जाही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत तरी कृपया या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्यांचा चांगला अभ्यास करा.

बारावी इतिहास बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका स्वरूप
कृतीपत्रिका आराखडा
एकूण गुण : ८०
प्रश्न १.
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधान पुन्हा लिहा. (६)
(ब) पुढील प्रत्येक संज्ञामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (६)
प्रश्न २.
(अ) ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण वा घटना यांसंबंधी नावे लिहा. (६)
(ब) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. (६)
प्रश्न ३.
(अ) पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (४)
(ब) दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. (५ पैकी कोणतीही ४) (८)
प्रश्न ४.
(अ) टिपा लिहा. (५ पैकी कोणत्याही ३) (६)
(ब) पुढील विधानांचे सकारण स्पष्ट करा. (५ पैकी कोणतेही ३) (९)
प्रश्न ५.
तुमचे मत नोंदवा. (५ पैकी कोणतेही ३) (९)
प्रश्न ६.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (३ पैकी कोणतेही २) (१०)
प्रश्न ७.
पुढील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा.
(५ पैकी कोणतेही ३) (१५)
घटकनिहाय गुणविभागणी
प्रकरण १
युरोपातील घडामोडींचा भारतावरील परिणाम – १० गुण
प्रकरण २
वसाहतीकरणाची प्रक्रिया – १० गुण
प्रकरण ३
भारताचे वसाहतीकरण – ०९ गुण
प्रकरण ४
युरोपीय वसाहतवादाला महाराष्ट्रात झालेला विरोध – १० गुण
प्रकरण ५ व ६
वसाहतवादविरोधी भारतीयांचा संघर्ष – ११ गुण
प्रकरण ७
निर्वसाहतीकरण व एकीकरण – ०९ गुण
प्रकरण ८
जागतिक महायुद्धे आणि भारत – १० गुण
प्रकरण ९
भारताबाहेरील प्रदेशांचे निर्वसाहतीकरण – ०६ गुण
प्रकरण १०
शीतयुद्ध – १० गुण
प्रकरण ११ व १२
बदलता भारत – २० गुण
