येई हो विठ्ठले | Vitthalachi Arati
येई हो विठ्ठले येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।। निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ. ।। आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ।। पंढरपुरी आहे माझा मायबाप ।। येई हो विठ्ठले माझे माऊली ये.. पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।। गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ।। येई हो विठ्ठले माझे माऊली ये …..
