अकरावी online प्रवेश प्रक्रिया 2026 | 11th Admission 2026
अकरावी online प्रवेश प्रक्रिया 2026 | 11th Admission 2026 link
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालाची तारीख अजून जाहीर झाली नाही पपरंतु या निकालाआधीच इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या तारखा मात्र जाहीर झाल्या आहेत. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल पासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया online पद्धतीने सुरु होणार आहे. सुरुवातील विद्यार्थ्यांना पोर्टल वर जाऊन रजिस्ट्रेशन कराव लागेल. या साठी भाग 1 भरावा लागणार आहे.

भाग 1 मध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती भरावी लागेल. जसे mobile नंबर, परीक्षा क्रमांक इ. यानंतर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन होईल. फॉर्म चा भाग १ भरल्यानंतर इयत्ता दहावीचा निकाल लागल्यावर भाग २ व्हारण्याची प्रक्रिया सुरु होईल.
https://mahafyjcadmissions.in/landing
या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचा फॉर्म चा पहिला भाग भारता येईल.
अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क साधा
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणी करायची आहे. अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना काही तक्रार आल्यास त्यांनी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर किंवा मदत क्रमांक ८५३०९५६६६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेंद्र पालकर यांनी केले आहे.
