नौदलात भरती 2026: १२ वी (विज्ञान) उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी
बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आणि विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. या विद्यार्थ्यांना भरतील नौदलात काम करण्याची मोठी संधी चालून आलेली आहे.
भारतीय नौदलाने १२ वी (विज्ञान शाखा – PCB) उत्तीर्ण पुरुष उमेदवारांसाठी ‘SSR Medical Assistant 02/2026 Batch’अंतर्गत भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. देशसेवेची आवड असलेल्या आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे.
पात्रता आणि शैक्षणिक अट
या भरतीसाठी उमेदवाराने १२ वी (Physics, Chemistry, Biology) विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असावा.
वयोमर्यादा
उमेदवाराचा जन्म १ सप्टेंबर २००६ ते ३१ ऑगस्ट २००९ या कालावधीत झालेला असावा.
वेतन आणि सुविधा
प्रशिक्षण काळात उमेदवारांना दरमहा सुमारे ₹१४,६००/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रारंभिक वेतन **₹२१,७०० ते ₹६९,१०० (Level 3) असेल. यासोबतच मिलिटरी सर्व्हिस पे ₹५,२००/- आणि इतर भत्ते दिले जातील. निवास, अन्न, गणवेश आणि वैद्यकीय सुविधा देखील नौदलाकडून उपलब्ध करून दिल्या जातात.
शारीरिक पात्रता
उमेदवाराची किमान उंची १५७ से.मी. असावी. वजन उंची आणि वयानुसार निश्चित केले जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड Indian Navy Entrance Test (INET) द्वारे केली जाईल. ही परीक्षा कॉम्प्युटर आधारित असेल.
एकूण प्रश्न: १०० प्रत्येक प्रश्न: २ गुण कालावधी: ६० मिनिटे
यानंतर शारीरिक व वैद्यकीय चाचणी होईल.
परीक्षा शुल्क
अर्ज करताना ₹५५०/- + अतिरिक्त शुल्क ₹५५/- ऑनलाईन भरावे लागेल.