MPSC द्वारा भरली जाणारी सरकारी पदे
भारताला स्वतंत्र मिळाल्यावर भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. शासन – प्रशासनाच्या चौकटीत मूलगामी बदल घडून आले. लोकनिर्वाचित प्रतींनिधी आणि त्यांना जबाबदार प्रशासन यांच्यावर राज्यकारभाराची जबाबदारी आली. जनतेचे प्रतींनिधी दर पाच वर्षाने निवडून द्यावयाचे असल्याने त्यांचे स्वरूप अस्थायी तर प्रशासनाची निवड दीर्घकाळासाठी केली जात असल्याने त्यास स्थायी स्वरूप प्राप्त झाले. स्वाभाविकच देशाच्या कारभारत सातत्य टिकवून ठेवणारी एक महत्वपूर्ण सार्वजनिक संस्था म्हणून प्रशासनाचे महत्व वाढले.