Maharashtra Board Exam 2023 | Practice Question Paper | Math | गणित सराव प्रश्नपत्रिका
यावर्षी २०२३ मध्ये इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च पासून सुरु होणार आहे. पहिला पेपर मराठी विषयाचा असून शेवट भूगोल या पेपरने होणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला १०० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. तसेच मागील वर्षी आपण आपापल्या शाळेत परीक्षा दिल्या तसे यावर्षी नसेल. यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा बोर्डाने नमूद केलेल्या केंद्रावर होईल. तसेच मागील वर्षी काही अतिरिक्त वेळ पेपर लिहिण्यास देण्यात आला होता. असा वेळ यावर्षी नसेल. त्यामुळे सर्व विषयांचा सराव करणे खूप गरजेची आहे. आज मी तुम्हाला गणित गणित विषयाच्या सरावाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या प्रश्नपत्रिका देणार आहे. प्रत्येक प्रकरणावर आधारित या प्रश्नपत्रिका आहेत. प्रत्येक प्रकरणावर २० गुणांची परीक्षा असणार आहे. या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षा २०२३ मध्ये उत्तम यश मिळेल.