कशी असेल अकरावी प्रवेश प्रक्रिया? CET चा फॉर्म भरण्याच्या पायऱ्या कोणत्या? जाणून घ्या !
कशी असेल अकरावी प्रवेश प्रक्रिया? CET चा फॉर्म भरण्याच्या पायऱ्या कोणत्या? जाणून घ्या !
नुकताच इयत्ता दहावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागला. हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर लावण्यात आला होता. हा निकाल जाहीर झाल्यावर आता अकरावी च्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. ही परीक्षा OMR पद्धतीने होणार असून 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्न या प्रश्नपत्रिकेत असतील. 19 जुलै पासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोप्पी आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क अकरावे लागणर नाही. तसेच त्याना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढीच माहिती संकेत स्थळावर भरावी लागेल. या परीक्षेसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या मुलांना जरी शुल्क भरावे लागणार नसले तरी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र १७० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
CET – परिपत्रक
प्रवेश अर्जाची प्रक्रिया आणि पायऱ्या खालील प्रमाणे असतील
- 11th CET (mh-ssc.ac.in) या संकेत स्थळावर जाणे.
- येथे CET साठी अर्ज असे असे एक पोर्टल असेल. तिथे क्लिक करावे.
- यानंतर आपला बैठक क्रमांक टाकण्यासाठी विचारले जाईल
- आपला बैठक क्रमांक टाकावा
- यानंतर परीक्षा द्यावी की नाही असे दोन पर्याय येतील
- या दोन पर्यायामधील योग्य त्या पर्यायावर क्लिक करावे.
- खालील फोटो पहा हीच वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला CET प्रवेश अर्ज नोंदवायचा आहे
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जर तुम्ही CET परीक्षा देणार असाल तर तुम्हाला काही दिवसांनी तुमच्या सेंटरचे नाव कळवले जाईल. यानंतर ही परीक्षा 21 ऑगस्ट पर्यंत होण्याचे संकेत बोर्डाने दिलेले आहेत.