बोर्डाचा पेपर कोणत्या पेनाने लिहावा? निळ्या – काळ्या की?

बोर्डाचा पेपर कोणत्या पेनाने लिहावा? निळ्या – काळ्या की?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. आता २ मार्च पासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरु होत आहे. बोर्डाने या परीक्षेसाठी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या संकेतस्थळावर २२ सूचनाही जाहीर केलेल्या आहेत. या २२ सूचनांमध्ये मुलांनी बोर्ड परीक्षेचे पेपर लिहिताना नेमका कोणत्या पेनाचा वापर करावा या संदर्भात सुद्धा भाष्य केलेले आहे.

विद्यार्थ्यांनी बोर्डाचा पेपर लिहिताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या पेनाचाच वापर करावा असे बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही पेनाचा वापर करू नये असे सांगण्यात आलेले आहे. गणित आणि विज्ञान विषयांच्या आकृत्या काढण्यासाठी पेन्सिलीचा वापर करावा असे सुद्धा सांगितले गेले आहे.

लिखाणाचा वेग वाढवण्यात पेनाची भूमिका –

परीक्षेत पेपर लिहित असताना किंवा इतर वेळीही बऱ्याच विध्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग खूप कमी जाणवतो. त्यामुळे पेपर आणि आपले लिखाणाचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही. त्यामुळे पेन वापरताना आणि लिहिताना खालील मुद्दे लक्षात ठेवावे.

१) शक्यतो ball पेन चा वापर करावा.

२) पेनाला पकडण्यास चांगली ग्रीप असेल असा पेन वापरा.

३) पेनाचा आकार जास्त जाड किंवा जास्त पटलाही नसावा. आपल्या हातात फीट बसेल असा पेन वापरावा.

४) पेनाचे टोपण पेनाच्या मागे लाऊन लिहू नका.

५) लिहिताना वहीवर जास्त दाब देऊन लिहू नका.

६) पेन पकडताना हलक्या हाताने पकडा, एकदम घटत पकडू नका.

Advertisement