दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर | वेळापत्रक आलं | SSC HSC Board Exam 2025 Time table
दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर | वेळापत्रक आलं | SSC HSC Board Exam 2025 Time table
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यामार्फत इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची परीक्षा यावर्षी लवकरच घेण्यात येणार आहे. नुकतेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा आठ ते दहा दिवस आधी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा मंडळाकडून जाहीर झाल्या आहेत. यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 या तारखेला सुरू होणार असून 18 मार्च 2025 या तारखेला संपण्याची शक्यता आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या काळात होणार आहे. मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा एक मार्च 2024 या तारखेला सुरू झाली होती. परंतु यावर्षी ही परीक्षा दहा दिवस आधी म्हणजेच 21 फेब्रुवारी या तारखेला सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करत माहिती देण्यात आली आहे.