या तारखेपासून दहावीच्या मुलांना शाळेतून मिळणार आपली गुणपत्रिका (Marksheet)
या तारखेपासून दहावीच्या मुलांना शाळेतून मिळणार आपली गुणपत्रिका (Marksheet)
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 16 जुलै 2021 या तारखेला online लागला होता, त्या निकालानंतर आता बोर्डाकडून 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आपल्या हातात गुणपत्रीका म्हणजे निकाल मिळणार आहेत. या गुणपत्रिका करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आज मंडळाकडून देण्यात आली.
येत्या 9 ऑगस्टला शाळांमधून गुणपत्रिका वाटप करण्यात येणार आहे येणार आहे. सोमवार दिनांक 9 ऑगस्ट ला दुपारी 3 वाजल्यापासून सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या विद्यालयात गुणपत्रिका मिळणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या 22 हजार 767 शाळांतून एकुण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी यावर्षी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील SSC बोर्डाचे लाखो विद्यार्थी निकाल केव्हा मिळेल याची प्रतीक्षा करत होते वाट पाहत होते परंतु आता त्यांची ही प्रतीक्षा संपली असून 9 ऑगस्ट रोजी सर्वाना आपापल्या शाळेत गुणपत्रिका मिळेल.