प्रति,
मा. ना. श्री. मुख्यमत्री
महारष्ट्र राज्य,
मंत्रालय – मुंबई
अर्जदार – श्री. महेंद्र दशरथ घारे – खोपोली
विषय – दहावी बारावी बोर्ड परीक्षा तेढ सोडवण्यासाठी उपाय सुचवणेबाबत.
महोदय,
मी. महेंद्र दशरथ घारे (खोपोली, ता.खालापूर, जिल्हा – रायगड). मी एका सामाजिक संस्थेत कार्यरत आहे तसेच मी माझा Creative Math Marathi हा शैक्षणिक YouTube channel सुद्धा चालवत आहे. या channel चे subscribers दीड लाखापेक्षा अधिक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दहावी बारावी बोर्ड परीक्षेबाबत खूप पेचप्रसंग उभे राहत असताना दिसत आहेत. परीक्षा घेतल्यात तर कोरोन वाढू शकतो आणि परीक्षा नाही घेतल्या तर दहावी आणि बारावी च्या वर्गानंतर असणाऱ्या वर्गांत प्रवेश प्रक्रिया कोणत्या आधारावर करायची. यावर मला सुचलेला एक उपाय तुम्हाला या पत्राच्या माध्यमातून सांगत आहे तरी कृपया योग्य वाटल्यास या पत्राचा विचार करावा.
आशय – या वर्षी प्रचलित बोर्ड परीक्षा रद्द करू शकतो आणि मुलांना थेट पास न करता जशी MPSC साठी पूर्व परीक्षा घेतो तशीच सर्व विषयांची मिळून एक बहुपर्यायी प्रश्नाची परीक्षा घेऊ शकतो. यातील मिळालेले गुण पुढील वर्षीच्या वर्गांच्या प्रवेश प्रक्रियेत मदत करतील.
आता वरील मुद्दा सविस्तर सांगून ही परीक्षा कशी घेऊ शकतो तीच स्वरूप काय असेल हे सांगतो.
- यावर्षी बोर्डाची परीक्षा रद्द केल्यास मुलाच्या मनावरील बरचसं ताण कमी होऊ शकतो. परंतु ज्यांनी अभ्यास केलाय आणि ज्यांची इच्छा आहे की परीक्षा व्हावी तसेच पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आधार म्हणून ही आपली परीक्षा खूप उपयुक्त ठरेल.
- ही परीक्षा 100 किंवा 200 गुणांची असू शकते. परीक्षा बहुपर्यायी असू असेल.
- यात एकूण 100 प्रश्न असतील. यात सर्व विषयांचे प्रश्न असतील.
- परीक्षा ऑफलाईन घेतली तरी एकच दिवस घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना सतत गर्दी करत शाळेत यावे लागणार नाही.
- ही परीक्षा ऑनलाईन घेणे सुद्धा सोयीस्कर ठरू शकते. परंतु ऑफलाईन घेतल्यास उत्तम.
- तसेच अनेक शिक्षणतज्ञ आणि बोर्ड यामध्ये दुरुस्ती सुद्धा सुचवू शकतात.
जरी कुठलीच परीक्षा नाही झाली तर पुढील वर्गांच्या प्रवेश प्रक्रिया कशा कराव्यात यावर उपाय
जरी कोरोनाचे संकट वाढले आणि कुठलीच परीक्षा नाही झाली तर पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी. विद्यार्थ्याला ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे त्या कोर्सशी निगडीत पूर्व परीक्षेचे अयोजंत संबंधित विद्यापीठात होऊ शकते. याचा उपयोग सुद्धा पुढील वर्गांच्या प्रवेश प्रक्रियेत होऊ शकतो.
एवढेच मुद्दे माझ्याकडून होते. नक्कीच आपणास हे मुद्दे आणि सुचवलेले सर्व उपाय योग्य वाटल्यास आपण नक्कीच विचार करावा.
कळावे,
आपला विश्वासू
श्री. महेंद्र दशरथ घारे
००४, निर्मल भक्ती बिल्डींग
लौजी, खोपोली, खालापूर, रायगड