दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे खरे वेळापत्रक कुठे बघायचे? बोर्ड परीक्षा २०२५
दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे खरे वेळापत्रक कुठे बघायचे? बोर्ड परीक्षा २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता दहावी आणि बारावीची यावर्षीची बोर्डाची परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. बोर्डाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जरी झहीर झाल्या असल्या तरी अजूनही सविस्तर वेळापत्रक मात्र जाहीर झाले नाही. परंतु अनेक सोशल मिडिया आणि इतर संकेत स्थळावर बोर्डाचे वेळापत्रक फिरताना दिसत आहे. परंतु हे वेळापत्रक खरे नाही असे बोर्डाचे म्हणणे आहे, कारण बोर्डाने अजूनही आपले वेळापत्रक जाहीर नाही केले. परंतु बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले आणि विविध माध्यमातून हे वेळापत्रक आपल्या पर्यंत पोहचल्यावर हे वेळापत्रक खरे कि खोटे हे कसे ओळखायचे? ही आज आपण समजून घेणार आहोत.

खरे वेळापत्रक हे तुम्ही थेट बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. हे कसं बघायचं? तर यासाठी सर्वात आधी आपण बोर्डाच्या वेबसाईट वर क्लिक करायचं. हि लिंक खालील प्रमाणे आहे.
https://www.mahahsscboard.in/mr
या लिंक वर क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे इंटरफेस दिसेल. आपण स्क्रोल करत खाली यायचं आहे.

स्क्रोल करत खाली आल्यावर आपल्याला विद्यार्थी लोगिंग वर क्लिक करायचं आहे.

विद्यार्थी लोगिंग वर क्लिक केल्यावर आपण वेळापत्रक बटनावर क्लिक करायचं आहे.

वेळापत्रक बटनावर क्लिक केल्यावर आपण इयत्ता दहावी किंवा बारावी सिलेक्ट करून संबंधित वेळापत्रक बघू शकता.