इयत्ता दहावी भूगोल – महत्वाचे प्रश्न
नमस्कार मित्रांनो या लिंक वर आपण खालील बटनांवर क्लिक करून भूगोल या विषयाची बोर्ड परीक्षेच्या अनुषगाने महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे pdf मध्ये बघू शकता.
मित्रांनो, इयत्ता सहावीपासूनच सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात आपण ‘भूगोल’ विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास करत आहोत. पृथ्वीच्या चार आवरणांसंबंधी विविध संकल्पना, प्रक्रिया व घटक यांची आपल्याला तोंडओळख झाली आहे. मानवी वस्त्यांचा विकास कसा होतो, मानव त्याच्या उपजीविकेसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर कशाप्रकारे करतो, कच्च्या मालाचे रूपांतर अधिक उपयुक्त पक्क्या मालात कशाप्रकारे केले जाते, ही उत्पादनेस्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेत कशाप्रकारे विक्रीसाठी पाठवली जातात, इत्यादींचाही अभ्यास आपण केला आहे. पर्यावरणातील साधनसंपत्तीचा अमर्याद वापर करण्याचे दुष्परिणामही आपण विचारात घेतले आहेत. भूगोल विषय अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्याला पुढील क्षमता आत्मसात कराव्या लागतात. l निरीक्षण l वर्गीकरण l फरक l तुलना l आलेख, आकृत्या आणि नकाशा यांचे वाचन l मूल्यमापन l विश्लेषण l निष्कर्ष l सादरीकरण l चिकित्सक विचार या क्षमता आत्मसात करण्यासाठी आपण आत्तापर्यंत शिकलेल्या भौगोलिक संकल्पना व प्रक्रियांचा उपयोग प्रदेशांच्या अभ्यासात करून अपेक्षित अध्ययन क्षमतांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यातून आपल्याला भूगोलाच्या ज्ञानाचे उपयोजन करता येऊ शकते. या इयत्तेत आपण असा अभ्यास दोन देशांच्या संदर्भात करणार आहोत. या वर्षी, आतापर्यंत शिकलेल्या विविध संकल्पनांची उजळणी करणार आहोत. हा अभ्यास तुम्हांला भूगोलाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यास व त्याच्या उपयोजनासाठी मदत करेल. त्याचबरोबर विविध नैसर्गिक व मानवी घटना समजण्यासाठी उपयुक्त ठरेल. भौगोलिक संकल्पनांचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितींची चांगली जाण होते. प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसेजुळवून घेतले आहे ते समजते. संसाधनांच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या कळतात. पर्यावरण ऱ्हासाचा व त्यांवरील उपायांचा विचार करता येतो. घटनांचा कल लक्षात घेऊन तुम्हांला त्यातील बदलांची प्रक्रिया समजावून घेता येईल. भविष्यात काय होईल याचा अंदाज करता येईल. नैसर्गिक दुर्घटना व आपत्ती यांना अधिक सक्षमपणे तोंड देता येईल शिवाय प्रादेशिक असमतोल व त्याची कारणेलक्षात घेऊन त्यांवर उपाय योजना करणे शक्य होईल.