भारतात प्राचीन काळापासून अनेक गणितज्ञांनी गणित विषयातील ज्ञानात मोलाची भर घातली आहे. यात अर्यभट, ब्राम्हगुत, भास्कराचार्य, बोधायन यांसारख्या अनेक गणिततज्ञांचा समावेश होतो. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी जन्मलेल्या ‘श्रीनिवास रामानुजन’ या गणिततज्ञाने भारतीयाच नाही तर जागतिक गणितात मोलाचे योगदान दिले आहे. या भातीय गणिततज्ञाबद्दल आपण जाणून घेवूयात.
‘श्रीनिवास रामानुजन’ – Shrinivas Ramanujan
“इतक्या लहान वयात रामानुजन मध्ये अफाट सुप्त शक्ती होती. त्याने गणिताच्या विश्वात जेवढी भर घातली. तेवढी कोणीही या शतकात घातली नाही.” – असे उद्गार इंग्लंडमधील जी. एस. हार्डी या गणिततज्ञान रामानुजनविषयी काढले आहे. रामानुजन आणि रामानुजनचं गणित जगासमोर आणण्याचं मोठ श्रेय या गणिततज्ञाचच. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला. तंजावर जिल्ह्यातील एरोड हे त्याचे जन्मगाव. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास अयांग्गर असे होते आणि आईचे नाव कोमलताम्मल होते. लहानपणी रामानुजांची आई त्याला ‘चिन्नास्वामी’ या नावाने हाक मारत असे. आईसोबत रामानुजन चा जास्तिस्त जास्त संवाद होत असे.
लहानपणी रामानुजन अतिशय भावनाप्रधान, हट्टी आणि मनस्वी स्वभावाचा होता. लहानपणी रामानुजन इतका हत्ती होता कि त्याला हवी असलेली एखादी वस्तू नाही मिळाली की तो जमिनीवर गडबडा लोळत असे. रडत असे. रामानुजन नेहमी गावातील मंदिरात जेवत असे. इतर कोणत्याही ठिकाणी जेवायला त्याला आवडत नसे. त्यामुळे इतर ठिकाणी जेवण करणे शक्यतो तो टाळत असे. लहानपणी तो इतर मुलांप्रमाणे नॉर्मल नव्हता. कारण जिथे मुले दीड – दोन वर्षात बोलायला शिकतात तिथे रामानुजन तीन वर्षाचा झाला तरी त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. त्यामुळे रामानुजनची आई रामानुजनची खूप काळजी करत असे. पुढे रामानुजन वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत जायला लागला. जसे एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात स्वातंत्र्य नसते तसेच शाळेच्या बाबतीत रामानुजानला वाटत असे. शाळेत त्याला एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यासारखे वाटत असे. त्यामुळे रामानुजनला शाळेत जायचा खूप कंटाळा येत असे.
रामानुजानला लहानपणापासून गीत विषय खुप आवडायचा. त्यामुळे गणितात त्याला नेहमी पैकीच्या पैकी गुण मिळत असे. तो प्राथमिक शिक्षण घेत असतानाच माध्यमिक च्या वर्गांची गणिते सोडवत असे. दोन वर्षातच रामानुजनने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि माध्यमिकच्या वर्गात दाखल झाला. एवढा हुशार होता तो लहानपणी. गणिताचा पेपर तर तो चुटकी सरशी सोडवून वर्गाच्या बाहेर पडत असे, बाकीची मुले आणि शिक्षक त्याच्याकडे बघतच बसत. गणित विषावर त्याचे इतके प्रेम होते की तो इतर विषयांकडे दुर्लक्ष करू लगला. कॉलेज मध्ये असताना रामानुजनला गणितात पैकी च्या पैकी गुण होते आणि इतर काही विषयात मात्र तो अक्षरशः नापास झाला होता.
रामानुजन एक गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत असायचा. त्याचा गणित सोडवण्याचा वेग सुद्धा अफाट होता. आपण जसे गणिते सोडवताना एक – एक पायरी असे सोडवतो. परंतु रामानुजला वेगाने गणिते सोडवण्याची सवय असल्याने तो पहिल्या पायारीवरून थेट तिसरी. तिसऱ्या पायरीवरून पाचवी. पाचव्या पायरीवरून आठवी अशी गणिते सोडवायचा. त्यामुळे पुढे अनेक गणित संशोधकांना त्याने सोडवलेल्या गणितांमधील उर्वरित पायऱ्या शोधण्यास खूप मोठा खटाटोप करावा लागला.
ज्या काळात भारतातील ब्राम्हणाने सातासमुद्रापलीकडे प्रवास करू नये असं सांगितलं जायचं त्याच काळात. त्याच काळात गणित विषयाचं संशोधन करण्यास रामानुजन केम्ब्रिजला गेला. केम्ब्रिजला गेल्यावर प्रोफेसर हार्डी यांच्या सहकार्याने रामानुजन याने गणितात मोठी प्रगती केली. रामानुजननं ‘मूळ संख्यांवर’ खूप मोठं संशोधन केलं होतं.अनेक नव्या समीकरणांचा शोध रामानुजन याने लावला. १९१४ साली रामानुजनने सादर केलेल्या शोधनिबंधात पाय ची किंमत दशांश चिन्हांनंतर अनेक घरांपर्यंत कशी काढता येते याचे विवेचन करता येते. १९१५ साली ‘इंग्लिश जर्नल’ मध्ये त्याचे पाच शोधनिबंध प्रकाशित झाले. तेव्हा त्याची कीर्ती जगभर पसरली होती. इंग्लंड येथील वास्तव्यात तेथील हवा मात्र रामानुजनला मानवली नाही. तेथील थंडीतही तो पहाटे गार पाण्यानेच अंघोळ करीत असे. रामानुजानाने त्या काळात आपल्या प्रकृतीकडे खूप दुर्लक्ष केले. आजारी असताना तेथील औषधे घेत नसे कारण डॉक्टरांच्या औषधांवर त्याचा विश्वास नव्हता. इंग्लंडमध्ये रामानुजनने खूप प्रगती केली. परंतु रामानुजन ला पुढे क्षय रोगाने ग्रासले. बळावलेल्या क्षय रोगामुळे शेवटी रामानुजन भारतात आपल्या घरी परतला. परंतु २६ एप्रिल १९२० रोजी वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या थोर गणिततज्ञाच निधन झालं.