मराठी निबंध | आत्मकथन | शाळेचे मनोगत | शाळेची आत्मकथा
“विद्यार्थी मित्रांनो, मी कोण? तर तुमची शाळा! जी निर्जीव आहे पण तुमच्या सारख्या सजीव मुलांना घडवण्याची जबाबदारी माझीच असते. माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या जडण घडणीतच जाते. अनेक पिड्या घडताना आणि घडवताना मी इथे पहिल्या.”
माझ्या आजूबाजूचा परिसर तसा खूप सुंदर, अगदी सगळ्यांना आवडणारा. मस्त मस्त झाडे माझ्या बाजूला आहेत. छान असं मैदान आहे. या मैदानात तुम्ही सगळे रोज खेळता तेव्हा मला खूप आनंद होतो. तुमच्या चेहऱ्यावरील आनंद बघताना. शाळेच्या अवतीभोवती खूप स्वच्छता आहे. फुलांच्या झाडांमुळे शाळा एकदम शोभून दिसते आणि शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि शाळा शुशोभित ठेवण्यात महत्वाचा वाटा आपल्या शाळेच्या शिपाई काकांचा आहे बरं का.
तुमच्या सारखी छान मुले मी नेहमी बघत असते. खूप प्रकारची मुले असतात बरं का इथे. काही खूप शांत तर काही खोडकर. पण मुले ती मुलेच ना खोड्या पण करणार ना थोड्याफार. पण या खोड्या सोबत थोडाफार अभ्यास पण हवा थोडाफार! शिक्षक पण खूप प्रकारचे इथे. नीर निराळ्या स्वभावाचे. कुणी शांत तर कुणी रागीट. कोणी मुलांना काहीच बोलत नाहीत तर कुणी खूप ओरडतं. पण हे सगळं तुमच्या भल्यासाठीच ना?
तुम्ही रोज शाळेत येता दिवसभर शाळेत असता. तेव्हा मला खूप मस्त वाटतं. पण जेव्हा शेवटची बेल होते तुम्ही घरी जायला निघता तेव्हा तुमचा निरोप घेताना अंत:करण भरून येते बरं का. कारण संपूर्ण रात्रभर येथे खूप शांतता असते. तुम्ही सोबत नसता. मला एकटीला तर करमतच नाही विद्यार्थ्यांशिवाय. रविवार तर मला नकोसाच वाटतो कारण तुम्ही सोबत नसता. मोठ्या सुट्ट्या आल्या कि तर माझे खूपच वाईट हाल. वर्गातल्या बाकावर धुळीचा मोठा थर जमा होतो. फळे एकदम शांत असतात. वर्गात शाळेच्या भिंतीवर जाळ्या जमा होतात. खूप दिवस असणारी ही शांतता मला खूप त्रासदायक वाटते आणि तुमची सुट्टी संपण्याची मी आतुरतेने वाट पाहत असते”
आणि एक दिवस शिपाई काका येतात वर्गात साफसफाई सुरु करतात तेव्हा माझ्या लक्षात येते कि आता उद्यापासून तुम्ही सगळे पुन्हा शाळेत येणार. तुमची सुट्टी संपली. अगदी रात्रीपासून तुमच्या भेटीची ओढ मला लागत असते.