नमस्कार मित्रांनो,
गणित विषय म्हंटल, की अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. जगातील अनेक मुलांचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे गणित विषय. आता हा दुश्मन कसा झाला. हे त्या बिचाऱ्या गणिताला पण नसेल माहित. कसं होत मित्रांनो आपण त्या गणिताकडे प्रेमाने नाही बघत. नेहमी रागाने त्या गणिताकडे बघतो. मग तो कशाला तुमच्याकडे प्रेमाने बघणार? म्हणून सगळ्यात आधी गणिताकडे प्रेमाने बघा. म्हणजे गणित विषय तुमच्याकडे प्रेमाने बघेल. मला गणित जमणारच हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आपण गणिताकडे बघायला हवय. तरच आपण गणितावर प्रभुत्व मिळवू शकतो.
खालील काही मुद्दे लक्षात घेतले तर नक्कीच कोणत्याही विद्यार्थ्याला गणितात उत्तम गुण मिळू शकतात.
- गणिताचा पाय आधी पक्का करून घेणे (गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी)
- सर्वप्रथम आपण ज्या धड्याचा अभ्यास करणार आहोत त्या धड्यातील महत्वाच्या संकल्पनांचा बारीक अभ्यास करावा. उदा. जर सरळव्याज हे प्रकरण असेल तर व्याज म्हणजे काय? मुद्दल, मुदत म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे.
- संकल्पना समजून घेतल्यावर आपण सूत्र समजून घ्या. संबंधित प्रकरणात जितकी सूत्रे असतील ती समजून घ्या. पाठ करा. एका वहीत किंवा कागदावर लिहून काढा.
- यानंतर तुम्ही पुस्तकात सोडवून दिलेली सोडवलेली गणिते समजून घ्या आणि ती गणिते नंतर न बघता सोडवण्याचा सराव करा.
- शेवटी तुम्ही सरावसंच सोडवण्याचा प्रयत्न करा. (हे बघा सराव संच सोडवणे हि पाचवी पायरी आहे. या अगोदरच्या चार पायऱ्या पूर्ण नसतील तर सरावसंच सोडवताना जास्तीत जास्त अडचणी येऊ शकतात.)
- सगळ्यात शेवटी या प्रकरणाचा आपल्या आयुष्यात कुठ उपयोग होईल काय याचा स्वतः विचार करा. आपल्या आयुष्यात जरी होत नसला तर आणखी कुठे होऊ शकतो याचा पण विचार करा.