मराठी व्याकरण – भाषेचे अलंकार
मराठी व्याकरण – भाषेचे अलंकार
ज्यामुळे भाषेला शोभा येते, तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ प्रभावी होतो. अशा चित्तवेधक शब्दरचनेला अलंकार म्हणतात. जसे एखाद्या स्त्री चे सौंदर्य तिने परिधान केलेल्या दागिन्यामुले खुलते. तसेच सौंदर्य भाषेला अलंकाराने येते. जसे लताबाई सुंदर गाणं म्हणतात हे वाक्य जेव्हा अलंकारिक रूपाने म्हंटले जाते तेव्हा त्या व्याक्यातील गोडवा आणि माधुर्य अजून जाणवते जसे – लताबाईचे गाणे जणू कोकीळकुजनच. भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत.
अलंकार – 1) शब्दालंकार 2) अर्थालंकार
2) अर्थालंकार –
आपण आज अर्थालंकार समजून घेणार आहोत. जे अलंकार शब्दांतून व्यक्त होणाऱ्या अर्थांवर आधारित असतात अशा अलंकारांना आपण ‘अर्थालंकार’ असे म्हणतो. अर्थालंकाराचे चार प्रकार आज आपण सजून घेणार आहोत. परंतु हे अलंकार समजून घेण्यागोदर आपल्याला उपमेय आणि उपमान म्हणजे काय हे समजून घेणे जास्त गरजेचे आहे.
उपमेय –
ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो. ज्याच्याशी तुलना करायची आहे तो
उपमान –
ज्याच्याशी तुलना करायची आहे तो.
उदाहरण. 1) सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे.
येथे सुरेशचे अक्षर हे उपमेय आणि मोती हे उपमान आहे.
रूपक अलंकार –
उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे. ते भिन्न नाहीत असे जेथे वर्णन केलेले असते. तेव्हा रूपक अलंकार होतो.
उदाहरण –
1) नायनकमल उघडीत हलके जागी हो जानकी
2) लहान मुल म्हणजे मातीचा गोळा
वरीलपैकी दुसऱ्या उदाहरणात लहान मुल हे उपमेय आणि मातीचा गोळा हे उपमान आहे. लहान मुलाची मातीच्या गोळ्याशी तुलना करताना हे दोघेही भिन्न नाहीत असा आशय याठिकाणी व्यक्त होतो. म्हणून येथे रूपक अलंकार दिसून येतो.
व्यतिरेक अलंकार –
उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. असे जिथे वर्णन केलेले असते तिथे व्यतिरेक अलंकार होत असतो.
उदाहरण –
अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा ||
दृष्टांत अलंकार –
एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.
उदाहरण –
हरिणीचे पाडस | व्याघ्रे धरियले ||
मजलागी जाहले | तैसे देवा ||
चेतनगुणोक्ती अलंकार –
निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत. अशी कल्पना करून त्या मनुष्याप्राने वागतात किंवा तशा कृती करतात. असे वर्णन जिथे असते तिथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
उदाहरण –
आला हा घरी उभा, वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला