महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ | Online अर्ज सुरु | १० नोव्हेंबरला परीक्षा | MAHATET 2024
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ | Online अर्ज सुरु | १० नोव्हेंबरला परीक्षा | MAHATET 2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याडून महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रक नुसार यावर्षी १० नोव्हेंबर २०२४ या तारखेला शिक्षक पात्रता परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८ वी या गटासाठी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (mahatet.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. यामुळे online अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (mahatet.in) या संकेत स्थळावर इच्छुक उमेदवार भेट देऊ शकतात.
सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक – ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
अ. क्रमांक | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
१ | ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ |
२ | प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे | २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४ |
३ | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ | दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM |
४ | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ | दि.१०/११/२०२४ वेळ १४.०० PM ते १६.३० PM |