भारतरत्न लता मंगेशकर
भारतरत्न लता मंगेशकर | Bharatratna Lata Mangeshkar
भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे आपल्या भारताची गान कोकीळा. त्यांच्या गायनाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले. ९५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी गीत गीत गाणाऱ्या लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर १९२९ मध्ये इंदोरमध्ये झाला. लतादीदींना एकूण चार भावंडे अशा, मीना, हृदयनाथ आणि मीना. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीत आणि नाटकात कामे केली. दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘आपकी सेवा मे या चित्रपटातील ‘पा लागू का जोर’ या गाण्याचे त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. 9 सप्टेंबर १९३८ रोजी सोलापुरात त्यांनी सर्वात आधी गीत सदर करून आपल्या करिअर चा श्रीगणेशा केला होता.
गाणे म्हणजे ईश्वराची पूजा असे लतादीदींचे मत होते म्हणून त्यांनी गाणे कधीही पायात चप्पल घालून गायले नाही. लतादीदी रेकॉर्डींग अनवाणीच करत. त्यांचा वडिलांनी त्यांना तंबोरा भेट म्हणून दिला होता तो तंबोरा त्यांनी अखेरपर्यंत जपून ठेवला होता. गायानासोबत लातादिदिना छायाचित्रे काढण्याचा म्हणजे फोटोग्राफी चा सुद्धा छंद होता. त्यांनी अनेक छायाचित्रे काढली होती. त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन परदेशात भरले होते. याना क्रिकेट खेळ खूप आवडत असे. ज्या दिवशी भारतीय संघाचा मोठा सामना असेल त्या दिवशी लतादीदी घरातील सर्व कामे बाजूला ठेवून क्रिकेट सामना बघत असत.
लता मंगेशकर यांची अजरामर झालेली काही गीते खालीलप्रमाणे आहेत
- होटो पे ऐसी बात मै दबाके चली आई
- मेरी आवाजही पहचान है
- ई मेरे वतन के लोगो
- लागा जा गले की फिर ये हसी रात हो न हो
- आज फिर जिने की तमन्ना है
- पिया तोसे नैना लागे रे
- आपकी नजरो ने समझा प्यार के कबिल हमे
- तुझे देखा तो ये जन सनम
- मेरी संसो मै तू है समया
- आजा सनम मधुर चांदनी मै हम
- तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा
- ये कहा आगये हम युही साथ चलते चलते
- आज गोकुळात रंग छेडतो हरी
- ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहुदे
- भय इथले संपत नाही
१८८९ मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००१ साली लतादीदींना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.