श्री दर्गादेवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।।
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ।। १ ।।
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।। धृ. ।।
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज से नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ।।
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ।। २ ।।
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ।।
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ||3||