डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील महु या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आणि वडिलांचे नाव रामजी असे होते. भीमाबाई आणि रामजी हे महार जातीचे होते. त्यांची मातृभाषा मराठी होती. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात होते. त्यांचे वडील सैन्यात सुभेदार आणि सैनिकी शाळेत मुख्याध्यापक असल्याने ते आपल्या परिवारासह महु येथील लष्करी तळावर होते. भीमराव हे रामजी आणि भीमाबाई यांचे चौदावे अपत्य होते. रामजी व भीमाबाई जरी 14 मुलांना जन्म दिला असला तरी यातील फक्त सातच मुले जिवंत राहिली होती.
ज्या काळात अस्पृश्य मानले जात असलेल्या महार जातीच्या लोकांना थोडेसुद्धा शिक्षण घेणे कितीतरी अवघड होते अशा त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम matric ची परीक्षा पास केली आणि नंतर चार वर्षाचे आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण करुन मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पास झाले. ही त्या काळातील खूप मोठी क्रांतिकारक अशी घटनाच मानवी लागेल. जिथे आपल्या भारत देशात महार जातीच्या विद्यार्थ्याला जातीभेदामुळे शिक्षण घेणे कितीतरी कठीण होते तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेत जाऊन न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचे तीन वर्ष शिक्षण घेवून एम. ए. , पी.एच.डी. यांसारख्या पदव्या मिळवणे म्हणजे एक मोठा पराक्रमच होता. त्यांची आपल्या आयुष्यात खूप पदव्या मिळवल्या. या इतक्या साऱ्या पदव्या बघून त्यांना ‘महान ज्ञानी’ , ‘समर्थ ज्ञानी’ म्हंटल तरी काहीच वावग ठरणार नाही.
१९३५ मध्ये येवला येथील अस्पृश्य परिषदेच्या मंचावरून डॉ. बाबासाहेब यांनी ‘हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’ असा निर्वाणीचा इशारा दिला होता. 20 जुलै 1924 रोजी डॉ. बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थ्येची स्थापना झाली. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश या संघटनेने दिला तसेच ‘शिकवा, चेतवा, संघटीत करा’ हे संथ्येचे ब्रीदवाक्य होते. या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून जीवाप्पा ऐदाळे यांच्या सहकार्याने सोलापूर येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी पहिले मोफत वसतिगृह सुरु झाले. 19 आणि 20 मार्च 1927 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यातील पाणी प्राशन करून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. यावेळी हजारो सत्याग्रहींनी तळ्याचे पाणी प्राशन केले. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सवर्णांच्या विरुद्ध केलेला पहिला लढा होता. चवदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यावर लगेचच 3 एप्रिल 1927 रोजी डॉ. बाबासाहेब यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरु केले होते.
सामाजिक समता निर्माण करण्यासाठी ४ सप्टेंबर 1927 साली डॉ. बाबासाहेब यांनी ‘समाज समता संघ’ ही संस्था सुरु केली. 1927 च्या डिसेंबर महिन्यात महाड येथे ‘सत्याग्रह परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत 25 डिसेंबर च्या रात्री विषमता आणि जातिभेदाचा समर्थन करणारा ग्रंथ मनुस्मृती याचे दहन करण्यात आले. हि बहुजन आणि शूद्रांचा आत्मविश्वास वाढवणारी मोठी आणि क्रांतिकारक घटना होती. मार्च 1930 मध्ये अस्पृश्यांना नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह सुरु केला. 15 ऑगस्ट 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खूप मोठे आहे. लवकरच या लेखात आणखी माहितीची भर घातली जाईल