इयत्ता दहावी – इतिहास व राज्यशास्त्र – नोट्स
इयत्ता दहावी – इतिहास व राज्यशास्त्र – नोट्स
सविस्तर उत्तरे लिहा.
खालील बटनांवर क्लिक करून नोट्स च्या PDF डाउनलोड करा.
सविस्तर उत्तरे लिहा.
प्रकरण १ – इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा
(१) आधुनिक इतिहिसलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर – आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये-
(१) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते.
(२) हे प्रश्न भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा – कहाण्यांशी जोडलेला नसतो.
(३) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते.
(४) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहास विषयात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.
(२) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पषाट करा.
उत्तर – एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या ‘दास कॅपीटल’ या ग्रंथात ‘वर्ग संघर्षाचा सिद्धांत’ मांडला. त्याच्या मते –
(१) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
(२) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरुपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
(३)समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते.
(४) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. त्यातूनच वर्गसंघर्षाला सुरुवात होते.
मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.
(३) लिओपॉल्ड व्हाॅन रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
उत्तर – लिओपॉल्ड व्हाॅन रांके यांनी इतिहासलेखन कसे करावे, याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते-
(१) इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे.
(२) इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्ताऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहचता येते.
(३) रांकेच्या मते, इतिहासलेखनात जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा.
(४) हेगेल याने इतिहासाच्या संदर्भात मांडलेले विचार स्पष्ट करा.
उत्तर – जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल याने इतिसाच्या संदर्भात पुढील विचार मांडले –
(१) ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे.
(२) इतिहासातील वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे.
(३) वेळोवेळी मिळत गेलेल्या पुरांव्याआधारे इतिहासकाराचे त्या घटनेबाबतचे प्रतिपादन बदलत जाणे स्वाभाविक असते.
(४) इतिहासातील कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी ‘द्वंद्ववाद पद्धती’ने समन्वयात्मक मांडणी करावी.