प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार ₹१ लाख ते ₹८ लाख! AGNIPANKH Scholarship 2026 मोठी संधी
प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार ₹१ लाख ते ₹८ लाख! AGNIPANKH Scholarship 2026 मोठी संधी
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी AGNIPANKH Scholarship 2026 ही एक उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली आहे. इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना असून, गुणवंत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती…

महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ फेब्रुवारी २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२६
- उशिर शुल्क कालावधी: १ एप्रिल २०२६ ते १५ एप्रिल २०२६
शिष्यवृत्ती रक्कम
- इयत्ता १ली ते ४थी: ₹१ लाख
- इयत्ता ५वी ते ८वी: ₹२ लाख
- इयत्ता ९वी ते १०वी: ₹५ लाख ते ₹८ लाख
👉 इयत्ता ११वीपासून पदवीपर्यंत दरवर्षी ₹१ लाख मिळणार
परीक्षेची रचना
ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे:
पेपर १: अभिक्षमता चाचणी
- उद्देश: प्राथमिक निवड (Shortlisting)
- प्रकार: MCQs
- विषय: गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, मराठी
- विशेष: या पेपरचे गुण अंतिम मेरिटमध्ये धरले जाणार नाहीत
पेपर २: अंतिम निवड चाचणी
- उद्देश: अंतिम निवड
- प्रकार: MCQs
- विषय: गणित, अभिक्षमता, इंग्रजी, सामान्य ज्ञान, मराठी + शैक्षणिक अभ्यासक्रम
- मूल्यमापन: संकल्पना, अनुप्रयोग आणि विश्लेषण क्षमतेवर आधारित
👉 अंतिम निवड फक्त पेपर २ वर आधारित असेल
परीक्षा शुल्क
- पेपर I:
- इयत्ता १ ते ४: ₹३८५/-
- इयत्ता ५ ते १०: ₹४८५/-
(अभ्यास साहित्य समाविष्ट)
- पेपर II:
- इयत्ता १ ते १०: ₹१८५/-
- उशिरा शुल्क: ₹१००/-
