दहावी बोर्ड परीक्षा 2025 | निकालाची तारीख जाहीर?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी लवकर घेण्यात आली होती. इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी तर इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा 11 फेब्रुवारी पासून सुरू झाली होती. त्यामुळे यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागणार असे बोर्डाकडून कळवण्यात आले आहे.

यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 15 मे च्या आत लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निकाल लवकर लागण्यासाठी बोर्डाकडून सुद्धा विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रत्येक शिक्षकाला इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपर शाळेतच तपासण्याचे सांगण्यात आले आहे तसेच प्रत्येक दिवशी किमान 35 पेपर तपासून झाले पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे दरवर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे संप असतात परंतु यावर्षी अशा प्रकारचे संपन्न असल्यामुळे पेपर तपासणीमध्ये कोणताही अडथळा असणार नाही. या सर्व कारणांमुळे यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचे बोर्डाचे पेपर लवकर तपासून होणार आहे यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागण्यास मदत होणार आहे.
दरवर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते. परंतु यावर्षी या दोन्ही परीक्षा लवकर सुरू झाल्या होत्या. दरवर्षी इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतो तर इयत्ता दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला लागतो. परंतु यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल 15 मे च्या आत लागणार आहे. त्यामुळे यावर्षीचे अकरावीचे वर्ग सुद्धा लवकर सुरू होतील.