जागतिक महिला दिन भाषण – निबंध
जागतिक महिला दिन भाषण – निबंध
कोणीतरी म्हंटल आहे कि एक पुरुष शिकला की त्या एका पुरुषाचा विकास होतो परंतु एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंबाचा विकास होत असतो. समाज आणि कुटुंबाचा विकास होण्यासाठी स्त्रियांचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वर्षी ८ मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो.
महिलांना शिक्षणाचा हक्क मिळायला हवा, नोकरीच्या समान संधी निर्माण व्हायला हवा, महिलांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने सन्मान मिळावा, रोजगार – राजकारण आणि समाजात स्त्रियांना मनाचे स्थान मिळावे या साठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. साधारणत: महिलांना आपल्या हक्कांबद्दल जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘जागतिक महिला दिनाची सुरुवात १९०० च्या सुरुवातीला झाली असली तरी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस १९७५ पासून अधिकृतपणे साजरा करायला सुरुवात केली.
महिलांना जागृत करण्यासाठी, महिलांचा विकास झाला पाहिजे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे, त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे या सगळ्या मात्वाच्या मुद्द्यांची आठवण करून देणारा हा दिवस असला तरी आजी संपूर्ण भारतात किंवा जगात किती प्रमाणात महिलांना समान संधी दिली जाते, त्यांचे किती प्रमाणात संरक्षण होते, कामाच्या आणि घराच्या बाहेरील ठिकाणी महिला किरी सुरक्षित याहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिधण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करायला हवाय?
भारतासारख्या देशात आजच्या तारखेला महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. परंतु ही वाढ इतकी समाधानकारक नाही. ज्या महिल्या चांगल्या शिकल्या असल्या तरी त्यांना नोकरची संधी मिळत नाही किंवा घरातून नोकरीला पाठवले जात नाही. त्यातल्या त्यात ज्या महिला नोकरीला जातात तिथे त्यांना संरक्षण नाही. विनयभंग – बलात्कार यांसारख्या अनेक घटना आपण बघत असतो. ज्या महिला नोकरीसाठी घराबाहेर पडतात त्यांना बऱ्याचदा घरातील सगळी कामे आवरून नोकरीला जावे लागते. खरतर फक्त ८ मार्च या दिवशी महिला दिन आहे म्हणून या दिवशी महिलांचा सन्मान राखायचा, महिलांच्या हक्कांची आठवण काढायचे याने महिला संक्षम नाही होणार तर संपूर्ण वर्षभर, प्रत्यके क्षणी महिलांच्या प्रगतीचा विचार मनात असणे गरजेचे आहे.