शाळा सुरु करण्यास 29.4% पालक आणि विद्यार्थ्यांचा विरोध
शाळा सुरु करण्यास 29.4% पालक आणि विद्यार्थ्यांचा विरोध
नुकतेच महाराष्ट्र बोर्डाने महाराष्ट्रातील शाळा या 1 सप्टेंबर पासून सुरु होतील असे संकेत दिले होते. यावर विविध स्तरांवरून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसतात. 1 सप्टेंबर पासून 3 टप्प्यांमध्ये शाळा सुरु होतील असे सांगण्यात आले होते. यावर पालकांना काय वाटते यावर Creative Math Marathi या शैक्षणिक youtube channel च्या माध्यमातून एक सर्वे करण्यात आला होता. यात 29.4% पालक आणि विद्यार्थ्यांनी सरकारने शाळा सुरु करण्याची घाई करू नये अशी प्रतिक्रियादिली होती.
63.5% जणांनी शाळा सुरु करणाच्या दिशेने कौल दिला होता तर 7.1% लोकांनी तटस्थ भूमिका घेतली होती. एकूण 296 लोकांनी या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अजूनही या प्रतिक्रिया देण्याची मोहीम सुरु आहे. तुम्हालाही या संदर्भात प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही प्रतिक्रिया देवू शकता.